Shukra Gochar 2023: शुक्र ग्रह गुरुवारी म्हणजेच 6 एप्रिल रोजी वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. शुक्र ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन करतो तेव्हा त्याचा प्रभाव देश, जग, आर्थिक, कौटुंबिक जीवन, करिअर यांच्यावर होताना दिसतो. गुरुवारी सकाळी 11.10 वाजता शुक्र ग्रह हा वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा सर्व राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिषशास्त्राप्रमाणे, जर तुमच्या कुंडलीमध्ये शुक्राची स्थिती मजबूत असेल तर करिअरमध्ये प्रगती, मान-सन्मान आणि आर्थिक लाभ होतो. दुसरीकडे कुंडलीमध्ये परिस्थिती चांगली नसल्यास अनेक चढ-उतारांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. दरम्यान शुक्र गोचमुळे कोणत्या राशींच्या अडचणी वाढणार आहेत, ते पाहूयात.


मिथुन रास


या राशीच्या व्यक्तींना या काळामध्ये काळजी घ्यावी लागणार आहे. या दरम्यान कामात थोडं काळजीपूर्वक रहावं लागेल. या राशीच्या व्यक्ती व्यवसायाच्या विस्ताराची योजना आखत असतील तर प्लॅन पुढे ढकलणं फायदेशीर ठरेल. या काळात तुमची गुपितं तुमच्या जवळ ठेवां. जोडप्यांमध्ये काही प्रकारचे गैरसमज होऊ शकतात, त्यामुळे याबाबत काळजी घ्या.


सिंह रास


सिंह राशीच्या व्यक्तींनी या काळात सतर्क राहिलं पाहिजे. जर तुम्ही गुंतवणूक करणार असाल तर ती टाळावी. आर्थिक बाबतीत कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करावा लागणार आहे. तब्येत खालावली असेल तर काळजी घ्यावी. नोकरी शोधणाऱ्या व्यक्तींना अजून काही वेळ वाट पाहू लागू शकते.


वृश्चिक रास


या राशीच्या व्यक्तींनी या काळामध्ये भरपूर काळजी घ्यावी. या काळामध्ये वाद होणार नाहीत, याकडे लक्ष द्यावं. नोकरदार लोकांना कमाच्या ठिकाणी अडथळे येऊ शकतात. जोडीदारासोबत कोणत्याही प्रकारच्या वादामुळे नात्यात दुरावा येण्याची दाट शक्यता आहे. कायदेशीर बाबींमध्ये अडकणार नाही, याबाबत सर्तक रहा.


मीन रास


शुक्राचं गोचर या राशीसाठी संकटं घेऊन येणार असेल. या काळात तुम्हाला कोणत्याही प्रकारामुळे मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबातील व्यक्तींशी वादविवाद होऊ शकतो. तसंच अनावश्यक खर्चापासून दूर राहिलं पाहिजे.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)