Kappar Yoga 2023 :​ वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला (Shukra Gochar 2023 ) अतिशय महत्त्व आहे. कला, वैभव, विलास सौंदर्याचा कारक जेव्हा आपली स्थिती बदलतो त्याचा परिणाम प्रत्येक राशीच्या जाचकावर होतो. 7 ऑगस्टला शुक्र कर्क राशीत वक्री स्थिती असणार आहे. 2 ऑक्टोबरपर्यंत तो इथे प्रतिगामी (Shukra Vakri 2023) अवस्थेत असणार आहे. त्यामुळे अनेक राशींच्या लोकांना आर्थिक फटका बसणार आहे. (shukra gochar venus transit in cancer khappar yoga 5 zodiac signs problem Shukra Vakri 2023)


'या' राशीच्या लोकांनी घ्यावी काळजी !


कन्या (Virgo)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्र वक्रीमुळे या राशीच्या लोकांना काळजी घेण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात समस्या जाणवणार आहे. खर्च वाढणार असून बचत होणार नाही. मोठी आर्थिक गुंतवणूक चुकूनही करु नका. जवळच्या लोकांपासून सावधान ते वाद निर्माण करु शकतात. खप्पर योगात या लोकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.


कर्क (Cancer)


 या राशीच्या लोकांना संयम राखावा लागणार आहे. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय या काळात घेऊ नका. जोडीदाराच्या कुटुंबात मतभेद होण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक स्थिती गडबडणार आहे. मोठी गुंतवणूक करु नका, अन्यथा नुकसान होईल. अशुभ खाप्पर योगाचाही वाईट परिणाम होऊ शकतो.


सिंह (Leo)


या राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये संकटांचा सामना करावा लागणार आहे. आर्थिक नुकसानासह कौटुंबिक कलह वाढणार आहे. धनहानी होणार आहे. कोणालाही कर्ज देऊ नका. व्यवसायात गुंतवणूक टाळा.  खर्च वाढल्यामुळे कुटुंबात तणावपूर्ण वातावरण राहील. 


मिथुन (Gemini)


या राशीच्या लोकांना अतिशय सावध राहावं लागणार आहे.  तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही बदलांना सामोरं जावं लागणार आहे. अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होणार आहे. तुमची आर्थिक स्थितीही बिघडणार आहे. प्रेम जीवनातही संकट येईल. 


कुंभ (Aquarius) 


या राशीच्या लोकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांचा जोडीदाराशी वादविवाद होणार आहे. आरोग्याची समस्या उद्भवणार आहे. संवादाच्या अभावामुळे गैरसमज वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी सतर्क राहा. आर्थिक गणित बिघडणार असून खर्च वाढणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)