Signature Astrology: आपली सही 'ही' आपल्या आयुष्यात फार महत्त्वाची मानली जाते. नोकरीच्या ठिकाणी, बँकेची कामं तसंच इतर अनेक कामांमध्ये आपली सही फार उपयोगी ठरते. तुमची सही ही केवळ एखाद्या कामामध्ये तुमची सहमती दर्शवत नाही तर तुमची पर्सनॅलिटी देखील दर्शवते. ज्योतिषशास्त्रात याची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्यक्तीच्या सहीद्वारे त्याच्या स्वभावाबद्दल आणि वागणुकीबद्दल बरीच माहिती मिळू शकते, असं ज्योतिषशास्त्रात म्हटलं आहे. अशाच काही सहीबाबतच्या गोष्टी आज जाणून घेऊया. 


तुमच्या सहीद्वारे जाणून घ्या स्वभाव


  • काही लोकं त्यांची सही करताना अक्षरं तोडून लिहीतात. किंवा स्वाक्षरी करताना त्यांनी लिहीलेही अक्षरं पकटन ओळखता येत नाही. ज्या व्यक्ती अशी सही करतात, ते गूढ स्वभावाचे असल्याचं मानलं जातं. इतकंच नाही तर अशा लोकांना ओळखणं फार कठीण असतं. 

  • काही लोकं त्याची सही एकदम स्पष्टपणे करतात. अशा लोकांच्या स्वाक्षरीमध्ये त्यांची अक्षर स्पष्टपणे समजून येतात. अशा व्यक्तींचा स्वभाव अगदी पारदर्शी असल्याचं मानलं जातं. 

  • अनेक व्यक्ती सही करताना सलग करतात. म्हणजेच या व्यक्ती स्वाक्षरी करताना एकदाही पेन उचलत नाहीत. ज्योतिषशास्त्रानुसार, असे लोकं परंपरेवर विश्वास ठेवणारे असतात. याशिवाय अशा व्यक्तींकडे पैशांची स्थिती देखील चांगली असल्याचं म्हटलंय. 

  • काही व्यक्तींच्या सहीची सुरुवात ही वरील बाजूस होते आणि त्याचा शेवट हा खालच्या बाजूला होते. असं मानलं जातं की, असे लोकं नकारात्मक विचारांचे असतात. या व्यक्ती कोणत्याही गोष्टीचा प्रथम नकारात्मकतेने विचार करतात. 

  • सही केल्यानंतर त्याखाली 2 बिंदू देणं ही अनेकांची सवय असते. कदाचित तुम्हीही सही केल्यानंतर असं करत असाल. अशा व्यक्ती सहसा दुसऱ्या कोणत्या व्यक्तींवर विश्वास ठेवत नाहीत. इतकंच नाही तर एखाद्याशी मैत्री करताना देखील ते समोरच्याला पारखून घेतात आणि मग त्याच्याशी मैत्रीचा निर्णय घेतात. 

  • तुमच्या ओळखीतील कोणी व्यक्ती सही करताना पेन जास्त वेळा गिरवते का? तुम्ही असं कधी पाहिलंय का? शक्यतो सही करताना अधिकतर पेन गिरवणाऱ्या व्यक्ती स्वभावाने फार हट्टी असल्याचं मानलं जातं. हट्टीपणामुळे त्यांना नुकसनीचाही सामना करावा लागू शकतो.

  • प्रत्येकाची सही करण्याची पद्धत वेगळी असते. जर एखाद्याच्या स्वाक्षरीचं पहिलं अक्षर मोठं असेल आणि उर्वरित अक्षरं लहान असतील तर अशा व्यक्तीला उच्च पदावर पोहोचते. 


(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याचं समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)