मुंबई : प्रत्येकाची सही करण्याची पद्धत वेगळी असते. सही करताना कोणी नावं लिहितं किंवा एका वेगळ्या पद्धतीने नाव लिहून सही करतं. दरम्यान तुमच्या स्वाक्षरीत असणारी अक्षरं तुम्ही कशा पद्धतीने लिहीता याचा तुमच्या आयुष्यावर प्रचंड प्रभाव पडतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एखाद्या व्यक्तीची स्वाक्षरी केवळ त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलच नाही तर समृद्धी आणि आनंदाबद्दल महत्वाची माहिती देते. म्हणूनच प्रत्येकाने त्याच्या स्वाक्षरीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. तुमची सही काय म्हणते ते आज तुम्ही जाणून घ्या.


तुमची सही उलगडते अनेक रहस्य


ज्या व्यक्ती सहीच्या खाली दोन रेषा देतात, असे लोक चांगले पैसे कमावतात. मात्र या व्यक्ती खूप कंजूष असतात. या लोकांची प्रकृती सामान्य असली तरी त्यांना असुरक्षित वाटत राहतं.


काही लोकं त्यांच्या सहीखाली एक रेषा काढून आणि त्यामागे एक किंवा दोन ठिपके लावतात. अशा लोकांना पैसे मिळवण्यात अधिक अडचणींचा सामना करावा लागतो. हे लोक चांगल्या पद्धतीने बचत करतात.


जर कोणी व्यक्ती आपल्या सहीमध्ये नावाचं पहिले अक्षर लिहून नावाच्या तळाशी एक बिंदू लावत असेल तर अशी व्यक्ती श्रीमंत असते. शिवाय ती आर्थिकदृष्ट्या मजबूत असण्याची शक्यता असते. त्यांचं वैवाहिक जीवनही आनंदी असतं.


जर कोणी व्यक्ती सरळ आणि सोप्या पद्धती सही करत असेल तर अशी व्यक्तीचं आरोग्य आणि पैसा यांची स्थिती सामान्य राहते. या लोकांना त्यांच्या आरोग्याची काळजी नसते.


सही करताना पहिलं अक्षर मोठं आणि बाकी अक्षरं लहान आणि सुबक लिहिली असतील तर व्यक्तीला हळूहळू उच्च स्थान प्राप्त होतं, असं मानलं जातं. त्याचं आरोग्य चांगलं राहतं.


कोणती व्यक्ती सही करताना पेनवर कमी दबाव टाकत असेल तर अशा व्यक्ती स्वतःला अधिकाधिक पैसे कमवायला भाग पाडतात. हे लोकं जास्त तणावाखाली असतात.
 
(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याचं समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)