Solar Eclipse in India Date and Time: दिवाळीचा सण आहे. मात्र, या दिवाळीच्या सणात सूर्यग्रहणाचा योग आहे. दिवाळीत ग्रहण आल्याने अनेकांच्या मनात शंका उपस्थित झाल्या आहेत. मात्र, या सूर्यग्रहणामुळे अनेक राशींचा याचा फायदा होणार आहे. दिवाळीत 25 ऑक्टोबर 2022, मंगळवारी सूर्यग्रहण तूळ राशीत होत आहे. सूर्याव्यतिरिक्त शुक्र, केतू आणि चंद्र ग्रहणाच्या वेळी तूळ राशीत असतील. यामुळे हे सूर्यग्रहण चतुर्ग्रही योग बनवेल. जे 4 राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर सिद्ध होईल. त्याचवेळी, ते राशीच्या लोकांसाठी अशुभ सिद्ध होईल. जाणून घ्या कोणत्या भाग्यशाली राशी आहेत. ज्यांच्यासाठी हे सूर्यग्रहण शुभ मानले जाऊ शकते. 


सूर्यग्रहणाचा कर्क राशीवर काय होणार परिणाम 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूर्यग्रहण कर्क राशीच्या लोकांसाठी भाग्याचे ठरेल. त्यांना प्रत्येक कामात नशीब साथ देईल. त्यामुळे त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होईल. पदोन्नती, नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. धनलाभ होईल. जमीन, मालमत्ता खरेदीची योजना पूर्ण होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. 


सिंह राशीवर सूर्यग्रहणाचा प्रभाव 


या सूर्यग्रहणामुळे सिंह राशीच्या लोकांना लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळेल. त्यांना पैसा मिळेल. अडकलेले पैसे मिळतील. उत्पन्न वाढेल. नोकरी शोधणाऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ पदोन्नती आणि वेतनवाढीच्या रूपात मिळू शकते. घरातील तरुण सदस्यांचे सहकार्य मिळेल. गुंतागुंतीच्या कामात यश मिळेल. 


धनु राशीवर सूर्यग्रहण प्रभाव 


धनु राशीच्या लोकांसाठी दिवाळीनंतर होणारे सूर्यग्रहण भरपूर धनप्राप्ती करु शकते. तुमच्या आर्थिक परिस्थितीसोबतच तुमच्या व्यक्तिमत्त्वातही सकारात्मक बदल होऊ शकतो. तुम्ही तुमचा मुद्दा योग्य पद्धतीने मांडाल. लोकांना मार्गदर्शन करु शकतील. तुमच्या प्रगतीला वाव मिळेल. प्रगतीसाठी नवीन संधींचा लाभ घ्या. तब्येत सुधारेल. एकंदरीत या राशींच्या लोकांना चांगले दिवस येतील.


मीन राशीवर सूर्यग्रहणाचा प्रभाव 


मीन राशीच्या लोकांवर सूर्यग्रहणाचा शुभ प्रभाव राहील. धनलाभ होईल. मात्र, शत्रूंपासून थोडे सावध राहावे लागेल. काही योजनांचे नियोजन करुन पुढे गेल्यास प्रत्येक गोष्टीत यश मिळेल. धीर धरणे खूप चांगले होईल. हे तुमच्यासाठी प्रगतीचा नवा मार्ग उघडेल. 


 


(Disclaimer:  येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)