आजचे राशीभविष्य | ९ डिसेंबर २०१९ | सोमवार
कसा आहे तुमचा आजचा दिवस?
मेष - कामात मन लागणार नाही. डोक्यात अनेक विचार सुरु राहतील. वायफळ खर्च होऊ शकतो. घाईमुळे कामं बिघडण्याची शक्यता आहे. अधिक विचार करु नका.
वृषभ - आजू-बाजूच्या लोकांमुळे त्रास वाटू शकतो. वेळ मिळेल तसा आराम करा. मन शांत ठेवा. विचार करुन मगच निर्णय घ्या. जुन्या समस्या डोकं वर काढू शकतात. कामं पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागू शकते.
मिथुन - विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या. आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. घाईत कोणताही निर्णय घेऊ नका.
कर्क - इतरांशी बोलताना शांतपणे बोला. चिडचिड करु नका. लोकांचं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न करा. तणावपूर्ण दिवस आहे.
सिंह - वैवाहिक जीवन चांगले राहील. शुभ वार्ता मिळू शकते. मनात अनेक विचारांचा गोंधळ सुरु असेल. कामात यश मिळेल.
कन्या - तुमचा सल्ला इतरांसाठी फायद्याचा ठरेल. अनेक जण तुमच्या संपर्कात राहतील. मित्र-परिवारासोबत वेळ जाईल. जोडीदारासोबत फिरायला जाऊ शकता. तब्येतीकडे लक्ष द्या.
तुळ - स्वत:च्या प्रगतीकडे लक्ष द्या. भविष्यातील गोष्टींवर विचार करा. पैसे सांभाळून खर्च करा. इतरांची मदत होऊ शकते. मन प्रसन्न राहील. करियरमध्ये प्रगतीसाठी प्रयत्न करा. जोडीदाराच्या भावनांचा विचार करा.
वृश्चिक - प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. जोडीदारासोबत वेळ जाईल. कौटुंबिक वातावरण चागंले राहील. कामाचा ताण राहील.
धनु - जुने आजार बळावू शकतात. तब्येतीच्या बाबतीत हलगर्जीपणा करु नका. स्वत:कडे लक्ष द्या. सावध राहा. कामं पूर्ण करण्यासाठी घाई करु नका.
मकर - चांगली बातमी मिळू शकते. दिवस आनंदात जाईल. गेल्या काही दिवसांपासून असलेला ताण कमी होऊ शकतो. खास व्यक्तींसोबत गोष्टी शेअर करु शकता.
कुंभ - बेरोजगारांना नोकरीच्या संधी मिळू शकतात. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामं आज पूर्ण करा. जोडीदारासोबत संबंध दृढ होतील.
मीन - महत्त्वाची कामं करण्यासाठी दिवस चांगला आहे. खुश, आनंदी राहाल. खर्च वाढण्याची शक्यता आहे. नवीन लोकांच्या भेटी होतील. जोडीदाराची साथ मिळेल.