आजचे राशीभविष्य | शनिवार | २२ जून २०१९
जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल.
मेष- बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे मार्गी लागतील. तुमची प्रतिमा सुधारण्याची संधी मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल.
वृषभ- व्यवसायात कामाचा व्याप वाढेल. मेहनतीने अर्थार्जन कराल. प्रेमप्रकरणासाठी अनुकूल काळ. प्रवासाचा योग संभवतो.
मिथुन- घाईघाईत एखादा निर्णय घेऊ नका. आर्थिक गोष्टींबद्दल चिंता वाढेल. नोकरी आणि व्यवसायात काही अडचणी येण्याची शक्यता. आरोग्याची काळजी घ्या.
कर्क- नोकरीच्या ठिकाणी काही अडचणी येण्याची शक्यता. हट्ट पकडून बसल्यास वादाचा प्रसंग उद्भवेल. विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. प्रकृतीच्या तक्रारी उद्भवतील.
सिंह- कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नोकरी किंवा व्यवसायात नवे करार होतील. सामाजिक कार्यात सन्मान मिळेल. प्रेमप्रकरणासाठी चांगला दिवस.
कन्या- व्यवसायात वृद्धी होईल. कनिष्ठांकडून सहकार्य मिळेल. नव्या लोकांच्या भेटीगाठी होतील. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले प्रश्न सुटतील.
तूळ- नोकरी आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता. दुसऱ्यांना नाराज न करता आपला कार्यभाग साधण्याचा प्रयत्न करा. जोडीदारासाठी खर्च करावा लागेल.
वृश्चिक- व्यवसायात अपेक्षित नफा मिळणार नाही. नोकरीत बदली होण्याची शक्यता. यामुळे कामच्या ठिकाणी लक्ष विचलित होईल. प्रेमसंबंधात तणाव निर्माण होण्याची शक्यता.
धनु- दैनंदिन कामे सुरळीतपणे पार पडतील. एखादा निर्णय विचार करून घ्या. कुटुंब आणि समाजात पत वाढेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.
मकर- नवे व्यवहार करणे टाळा. दिवसाची सुरुवात आश्वासक होणार नाही. वायफळ गोष्टींवर पैसा खर्च होईल. मनातील गोष्टी इतरांना सांगू नका.
कुंभ- आर्थिक चणचण संपेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता. पाल्याच्याबाबतीत सुवार्ता कानी पडेल.
मीन- व्यवसायात तुर्तास नव्या योजनांची अंमलबजावणी टाळा. महागड्या गोष्टींची खरेदी होऊ शकते. प्रेमप्रकरणासाठी अनुकूल काळ. थकवा आणि कमी झोपेचा त्रास जाणवेल.