आजचे राशीभविष्य | रविवार | २३ जून २०१९
कसा असेल तुमचा आजचा दिवस
मेष- आज कोणत्याही कामाकडे दुर्लक्ष करू नका. नोकरी आणि व्यावसायात दिलेले टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नवीन ओळखी होतील. दिवस उत्साही असेल. कुटुंबासह चांगला वेळ घालवाल. आर्थिक समस्या मार्गी लागतील.
वृषभ- नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही केलेल्या योजनांना समर्थन मिळू शकेल. व्यावसायात यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. सकारात्मक विचार ठेवा. साथीदारा बाबतीत जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे.
मिथुन- आज तुम्हाला नव्या नोकरी, व्यावसात नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. विचार केलेली सर्व कामे पूर्ण होतील. खास कामाची सुरूवात कराल. आज तु्म्ही उत्साही राहाल. कामात हळू-हळू यश मिळेल.
कर्क- जुन्या कामांचा फायदा होण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रांची अचानक गरज भासेल. धार्मिक यात्रेला जाण्याचा बेत आखाल. दिवस शांतीपूर्ण राहील. मेहनत कमी होण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रत्येक कामात जोडीदाराची साथ लाभेल.
सिंह- नोकरीमध्ये सहकार्यांची मदत मिळेल. पुढे वाटचाल करण्याचा कल आहे. दिलेले काम पूर्ण कराल. काही अधिकच्या जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील छोट्यांकडून मदत मिळेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यावसायात लाभ होऊ शकतो.
कन्या- पुढे वाटचाल करण्यासाठी संधी उपलब्ध होतील. कुटुंबात तुम्ही दिलेल्या सल्ल्याला अधिक प्राधान्य दिले जाईल. आवडतीच्या व्यक्तीला तुमच्या मनातील गोष्ट सांगाल. व्यावसायात बदल करण्याची शक्यता आहे.
तुळ- दिवस व्यस्त अलेल. शांतीपूर्वक विचार करून निर्णय घ्या. इतरांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका. आवडतीच्या व्यक्तीला तुमच्या मनातील गोष्ट सांगाल. कागदी कामांवर लक्ष द्या. जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे.
वृश्चिक- अडचणीत सापडलेले काम पूर्ण होईल. त्यामुळे यश मिळण्याची शक्यता आहे. जुन्या गोष्टी विसरून पुढे वाटचाल कराल. आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकतो. पैश्यांचा फायदा मिळण्याची शक्यता आहे.
धनू - खास कामांसाठी मित्रांची मदत मिळेल. महत्वपूर्ण कामांमध्ये ऑफिसमध्ये अनेक कामांमध्ये यश मिळेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल. प्रमोशन होण्याचे योग आहे. नवीन भेटी होतील. व्यापार करणाऱ्यांचा अडकलेला पैसा मिळेल.
मकर- व्यवसायात फायदा होईल. विद्यार्थांना मेहनत केल्यास अधिक चांगले परिणाम मिळू शकतात. जुन्या गुंतवणूकीतून फायदा होईल. कुटुंबातील व्यक्तींशी असलेल्या संबंधांमध्ये सुधारणा होईल. महत्त्वाची कामं पूर्ण होतील. नवीन काम सुरु करण्याचा प्रयत्न करु शकता.
कुंभ- पैसे गुंतवणूक करण्यासाठी चांगल्या योजना करू शकता. काही करार तुमच्या बाजूने असू शकतात. तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळू शकेल. तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. नोकरी आणि व्यावसायात भरभराटी मिळेल. चांगली बातमी मिळेल.
मीन- अनेक योजनांचे बेत आखू शकाल. स्वत:वर संयम ठेवा. पैश्यांसंबंधीत चांगली संधी मिळू शकेल. काही गोष्टींमध्ये नव्याने सुरूवात कराल. काही निर्णय तुम्ही स्वत:च्या मनाने घ्याल.
डॉ. दिपक शुक्ल