मेष -कामाच्या ठिकाणी थोडा ताण असेल. दिवसभर व्यग्र असाल. व्यवसायामध्ये यश मिळेल. अनेक बाबतीत यशस्वी ठराल. प्रवासाचा योग आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- जुन्या गोष्टींविषयीच्या अडचणी दूर होतील. नव्या कपड्यांची खरेदी कराल. सक्रियतेचा स्तर वाढेल. समाज आणि कुटुंबात तुमचा स्तर वाढेल. मिळकत आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. 


मिथुन- धनलाभ होण्याची शक्यता आहे. अशा कामांचा फायदा होईल, जो दीर्घ काळासाठी टीकेल. अनेक योजना आखाल. 


कर्क- अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळतील. कामावर लक्ष ठेवा. व्यवहारकौशल्य राखा. अनेक अडचणींवर तोडगा काढाल. 


सिंह- आर्थिक परिस्थितीमध्ये काही महत्त्वाचे बदल होतील. ज्यामुळे तुमच्या जीवनात आनंद असेल. महत्त्वाकांक्षा वाढलेली असेल. कामाच्या निमित्ताने प्रवासाला जावं लागेल. मेहनत करा. ताणतणाव दूर होईल. एखाद्या गोष्टीविषयी ताण घेत असाल तर तो दूर होईल. 


कन्या- ऑफिस किंवा व्यापारामध्ये एखादी नवी सुरुवात करण्याची संधी तुम्हाला मिळेल. कामात नवा प्रयोग करण्याची संधी आहे. साथीदारासोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल. अपूर्ण कामं मार्गी लावाल. 


तुळ- विचाराधीन कामं पूर्ण होतील. कुटुंबाला जास्तीत जास्त वेळ द्या. मित्रांसमवेत काही बेत आखाल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी किंवा व्यापारामध्ये घेण्यात आलेले काही निर्णय फायद्याचे ठरतील. 


वृश्चिक- आजचा दिवस तुमच्यासाठी खास असेल. काही गोष्टी समोर येतील, ज्या तुमच्यासाठी फायद्याच्या ठरतील. समजुतदारपणे निर्णय घ्या. दिवस चांगला असेल. एखादा आजार बळावेल. नशीबाची साथ मिळेल. 


धनु- नोकरी, करिअर, पैसा यांच्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय चांगला आहे. नवी नोकरी किंवा बढतीच्या प्रतिक्षेत असाल तर, पूर्ण प्रयत्न करा. यशस्वी ठराल. कामाच्या ठिकाणी अनेकजण तुमच्याशी सहमत असतील. अनेकजण तुमच्या मदतीसाठी तयार असतील. 


मकर- एखादं मह्त्त्वपूर्ण काम कराल. या कामाचा फायदाच होणार आहे. नव्या कामाची सुरुवात करण्यापेक्षा जुनी कामं उरकण्यावर भर द्या. इतरांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करा. 



कुंभ- आज तुम्ही धैर्याने काम करा. दिवसभर पैशांचाच विचार करत असाल. दैनंदिन कामांचा व्याप वाढलेला असेल. धीराने काम करा. प्रगतीचाच विचार करा. 


मीन- आज जी कामं हाती घ्याल त्यांचा तुम्हाला फायदाच होणार आहे. कागदोपत्री कामावर लक्ष देऊ नका. प्रवासासाठी आजचा दिवस चांगला आहे.