राशीभविष्य | १ डिसेंबर २०१९ | रविवार
आजचा दिवस कसा असेल
मेष - दिवसाची सुरूवात शुद्ध मनाने करा. रखडलेल्या कामांवर आज निर्णय घेवू शकता. स्पष्ट विचारांमुळे निर्णय घेणं सोपे होईल. वरिष्ठांचा सल्ला नक्की घ्या.
वृषभ- तुम्ही फार भाग्यशाली आहात. तुमचं अवडतं छंद जपा. प्रवासाचे योग आहे. खर्च होण्याची शक्यता आहे. दिवस चांगला आहे. नवीन वस्तू खरेदी कराल.
मिथुन- आजचा दिवस तुमच्यासाठी फार चांगला आहे. घर किंवा बाहेरच्या जागेची सफाई करण्याकडे लक्ष द्या. समाधान मिळण्याची शक्यता आहे.
कर्क- नियमित व्यायाम करा. तुमच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरेल. आरोग्याकडे लक्ष द्या. आपली मत आणि बोलण्याने आज तुम्ही इतरांना प्रभावित कराल. विचार करण्याच्या पद्धतीमध्ये बदल करा. मित्र-परिवाराकडून वेळेवर मदत मिळेल. कुटुंबातील काम संपवाल.
सिंह- बेरोजगार लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. व्यवसायात यश मिळेल. कोणताही महत्वाचा निर्णय भावूक होऊन घेऊ नका. महत्वाचे बदल तुमच्या जीवनात होतील.
कन्या- मित्र-परिवाराची मदत मिळेल. पैसे आणि इतर बाबतीत आजचा महत्वाचा दिवस आहे. समोर येणाऱ्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाल. कामाच्या पद्धतीत सुधारणा कराल.
तुळ- आजचा दिवस अगदी सामान्य असेल. प्रश्नांपासून स्वतःला वाचवा. भांडणांपासून देखील स्वतःला दूर ठेवा. दिवस कष्टाचा असेल पण संध्याकाळी एक चांगली बातमी कानी पडेल.
वृश्चिक - बेरोजगारांना आज नोकरी मिळू शकेल. वेळ लागणाऱ्या गोष्टी आज टाळा. महत्वाची काम पूर्ण करण्यासाठी आज वेळ मिळेल. मोठा निर्णय घेण्याचा आज विचार कराल.
धनु- वर्ष आता संपत आलं आहे. त्यामुळे नवीन वर्षाकरिता संकल्प तयार करा. खूप दिवसांपासून मनात राहिलेली इच्छा आज पूर्ण होईल. गोड बोलून सर्व काम करून घ्या. विश्वास ठेवा आणि दुसऱ्यांचा मूडचा देखील विचार करा.
मकर- पैसे कमवण्याच्या प्रयत्नाला यश मिळेल. जुने वाद संपतील. समोरच्या व्यक्तीचा विचार करा. शुभ वार्ता कानी पडेल.
कुंभ- आपली मत आणि बोलण्याने आज तुम्ही इतरांना प्रभावित कराल. विचार करण्याच्या पद्धतीमध्ये बदल करा. मित्र-परिवाराकडून वेळेवर मदत मिळेल. कुटुंबातील काम संपवाल.
मीन- दररोजची नियमित ठरलेली काम संपवण्याकरता देखील अधिक मेहनत करावी लागेल. आपली जबाबदारी लक्षात ठेवून काम करा. जुने वाद संपतील. नवीन वर्षासाठी संकल्प तयार करा.