मेष- वायफळ खर्च होऊ शकतो. थोडे सावध राहा. कोणाचं म्हणणं ऐकून स्वत:चं नुकसान करुन घेऊ नका. आर्थिक व्यवहारांमध्ये कोणावरही विश्वास ठेवू नका. काहीजण तुमच्या मनसुब्याचा गैरसमज करतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- नोकरीच्या ठिकाणी आज फायदा होणार आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. दिवसभर विचाराधीन कामं पूर्ण होतील. कोणा एका कठिण कामात इतरांचं सहकार्य मिळेल. 


मिथुन- बिजनेस किंवा कामाच्या ठिकाणी अडकलेले पैसे परत मिळतील. एखाद्या नव्या प्रस्तावासाठी तयार राहा. सरकारी काम करणाऱ्यांना आज फायदा होणार आहे. अडकलेले पैसे परत मिळतील. साथीदाराकडून सहकार्य मिळेल. 


कर्क- अचानक होणाऱ्या धनलाभामुळे नव्या व्यापाराच्या संधी मिळतील. नोकरीच्या ठिकाणी नाती आणखी दृढ होतील. साथीदारासोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत कराल. 


सिंह- अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळेल. सावध राहा. आर्थिक परिस्थितीमध्ये अचानक मतभेद होतील. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सावधगिरी बाळगा. 


कन्या- नोकरीसापेक्ष लोकांना बढती मिळणार आहे. गुंतवणूक करताना विचार करा. स्वत:साठी थोडा विचार करा. एखादी शुभवार्ता मिळेल. तुमच्या कामाचं चीज होईल. 


तुळ- व्यापाराच्या ठिकाणी अडकलेले पैसे परत मिळतील. आज तुम्ही असं काम कराल ज्याची सर्वदूर प्रशंसा होईल. कोणा एका व्यक्तीची मदत कराल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. 


वृश्चिक - व्यवसायाचे नवे बेत आखाल. नव्या योजना आखाल. विचाराधीन कामं पूर्ण होतील. तुम्ही आखलेले बेत बदलू नका. 


धनु- आज दैनंदिन कामांना अधिक प्राधान्य द्याल. घाई करु नका. सावध राहा. अशा एका परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो, ज्यामध्ये तुमची सहनशीलता मदतीली ठरेल. ऋतूबदलांमुळे होणाऱ्या आजारपणापासून दूर राहा. 


मकर- व्यापारात अडकलेले पैसे परत मिळतील. कामाच्या ठिकाणी काही अडचणींवर सहजपणे मात कराल. कौटुंबीक जबाबदाऱ्यांना दूर ठेवू नका. आज विचाराधीन कामं पूर्ण होतील. 



कुंभ- दिवस चांगला असेल. इतरांशी विनम्रतेने वागा. मनात कोणत्याही प्रकारचा संकोच ठेवू नका. थोडी धावपळ होईल. पण, तरीही दिवस चांगला असेल. 


मीन- नव्या कामाची सुरुवात कराल. अचानक कोणामार्फत मदत होईल. अडकलेले पैसे आणि अर्थार्जनाच्या नव्या संधी अगदी सहजपणे मिळतील.