राशीभविष्य २१ जानेवारी : `या` राशीच्या व्यक्तींची महत्त्वाची कामं पूर्ण होतील
असं आहे आजचं राशीभविष्य....
मेष- कोणतंही काम तुम्ही पूर्ण विचारानेच करत आहात. त्यामुळे इतरांकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नका. आज होणाऱ्या चर्चा तुम्हाला भवितव्यात मदतीच्या ठरतील. व्यवहार कौशल्य टीकवून ठेवा. काही दिग्गजांना भेटण्याची संधी मिळेल.
वृषभ- शांततेत काही बेत आखा. मन लावून काम करा. वेळ येताच या साऱ्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. एखादी शुभवार्ता मिळेल. व्यापाराच्या निमित्ताने परदेशात जाण्याची संधी मिळेल.
मिथुन- स्वत:ची जबाबदारी इतरांवर सोपवू नका. भावनात्मक परिस्थितीमध्ये स्वत:वर नियंत्रण ठेवा. आर्थिक बाबतीत प्रगती होणार आहे. चांगले अनुभव मिळतील. अनुभवी व्यक्तींचा सल्ला मिळेल.
कर्क- अचानक फायदा होण्याचा योग आहे. अडकलेले पैसे मिळतील. कोणत्याही गोष्टीबाबतचा तणाव दूर होईल. बरेच उत्साही असाल. काही प्रगतीशील बेत आखाल.
सिंह- नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत लक्ष्य निर्धारित करा. लहानमोठ्या विषयांवर चर्चा कराल. मित्रमंडळींची साथ लाभेल.
कन्या- अनेक अडचणी दूर होतील. आजच्या दिवशी तुम्ही यशस्वी व्हाल. कामाचा व्यास वाढवण्यासाठी प्रयत्नशील असाल. नोकरी आणि पैशांच्या दृष्टीने आजचा दिवस चांहला आहे.
तुळ- चांगल्या वाणीमुळे तुमचा फायदा होणार आहे. करिअर आणि खासगी जीवनाला प्राधान्य द्याल. मोठ्यांचा आशीर्वाद मिळेल. कुटुंबात काही आनंदाचे क्षण येतील.
वृश्चिक - आज एखाद्या मोठ्या गोष्टी निर्णय घ्याल. गेल्या काही दिवसांपासून जी उलथापालथ सुरु आहे ती अखेर थांबेल. मौल्यवान वस्तूंचा फायदा मिळेल. खाण्याच्या सवयींवर लक्ष द्या.
धनु- पुढे जाण्याची चांगली संधी आहे. शक्य तितके शांत राहा. कुटुंबामध्ये तणावाचं वातावरण असेल. नव्या वस्तूंची खरेदी कराल.
मकर- नव्या कामाची सुरुवात करु इच्छाता, तर त्यावर लक्ष केंद्रीत करा. आज काही खास व्यक्तींसोबत वेळ व्यतीत करा. दिवसभर काय करायचं आहे, याचा बेत आखा.
marathi news, marathi, marathi news paper, marathi news online, marathi, samachar, marathi latest news, sports news, marathi news, marathi, marathi news online, marathi, samachar, marathi latest news, national news, national news in marathi, national
कुंभ- धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या ओळखी वाढतील. काही अडचणी दूर होतील. धैर्याने पुढे जा.
मीन- गरजेपेक्षा जास्त काम करण्याती तयारी असेल. काही निर्णय तडकाफडकी घ्यावे लागतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल.