आजचे राशीभविष्य | सोमवार | २१ ऑक्टोबर २०१९
जाणून घ्या कसा आहे तुमचा आजचा दिवस
मेष- कोणा एका व्यक्तीशी मतभेद होऊ शकतात. कामाच्या बाबतीत कोणतीही भीती मनात ठेवू नका. गरजेनुसार आर्थिक व्यवस्था सांभाळा. विवाहितांसाठी आजचा दिवस चांगला आहे.
वृषभ- नवं कार्यालय खरेदी करण्याचा विचार कराल. कामासाठी प्रवास करण्याचा योग आहे. नोकरदार वर्गाने अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा. कामाची पद्धत सुधारेल. प्रेमसंबंध सुधारतील.
मिथुन- दैनंदिन कामांमध्ये तुमचं मन रमणार नाही. भावनांवर ताबा ठेवा. अतिउत्साहाच्या भरात कोणतंही काम बिघडू शकतं. आहारात्या बाबतीत बेजबाबदारपणा बाळगू नका.
कर्क- व्यवसायामध्ये मित्रांची मदत मिळेल. दैनंदिन कामं पूर्ण होतील. तुमच्या क्षेत्रात पूर्णपणे यशस्वी व्हाल. अपूर्ण कामं पूर्णत्वास न्याल. अविवाहित प्रेमी युगुलांसाठी दिवस चांगला आहे. लहानसहान गोष्टींवर रागवू नका.
सिंह- नोकरीमध्ये बऱ्याच वायफळ कामांमध्ये अडकून पडाल. चांगल्या निकालाच्या प्रतिक्षेत असाल, तर मेहनत करावी लागेल. महत्त्वाच्या कामांवर लक्ष द्या. आरोग्याची काळजी घ्या.
कन्या- नोकरीच्या ठिकाणी उगाचच कोणत्याही वादापासून दूर राहा. वरिष्ठ तुमच्या कामाने प्रभावित असतील. कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो. महत्त्वाच्या कामांवर लक्ष द्या.
तुळ- जास्त मेहनत करावी लागू शकते. कामाचा व्याप वाढेल. जुन्या गोष्टींवर लक्ष देऊ नका. प्रेम व्यक्त करण्य़ात संकोचलेपणा नको. करिअरचा गांभीर्याने विचार करा. साथीदाराच्या भावनांचा विचार करा.
वृश्चिक - व्यवसायात फायद्याचा योग आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण तुमच्याच पक्षात आहे. इतरांची मदत करणं फायद्याचं ठरेल. विवाहितांसाठी दिवस चांगला आहे. आरोग्याची काळजी घ्या.
धनु- आज कामाचा व्याप वाढेल. कनिष्ठांची मदत मिळेल. एखादी तणावाची गोष्ट दूर होईल. पार्टटाईम काम सुरु कराल. थकवा जाणवू शकतो.
मकर- दिवसभर व्यग्र असाल. वरिष्ठ तुमचं बोलणं गांभीर्याने घेतील. कामाच्या ठिकाणी सन्मान मिळेल. जास्त मेहनतीने यश मिळेल. आरोग्य सुधारेल.
कुंभ- व्यवसायात फायदा कमी होईल. बदलीचा योग आहे. आर्थिक अडचणीत अडकाल. जुन्या मित्रांची मदत मिळेल. गरज लागेल तेव्हा तडजोड करण्यासाठी तयार राहा.
मीन- वेळ तुमच्याच पक्षात आहे. व्यापारामघ्ये प्रगतीचा योग आहे. नोकरीच्या ठिकाणी परिस्थितीय तुमच्या नियंत्रणात असेल. नव्या लोकांची भेट घडण्याचा योग आहे. त्यांचा तुमच्याव सकारात्मक परिणाम होणार आहे.