Ram Navami Upay: मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम (Shri Ram) यांचा जन्म चैत्र महिन्यात झाला होता. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या (Shukla Paksha Chaitra month) नवव्या तिथीला झाला, तेव्हापासून या तिथीला देशभर भगवान रामाची जयंती (Shri Ram Jayanti) साजरी केली जाते. याला राम नवमी (Ram Navmi 2023) असंही म्हणतात. यंदा रामनवमी 30 मार्च 2023 रोजी आहे. त्यामुळे आता राम भक्तांमध्ये भक्तीरस संचारला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिषशास्त्रानुसार (According to astrology), राम नवमी 29 मार्च 2023 रोजी रात्री 09:07 पासून सुरू होऊन 30 मार्च 2023 रोजी रात्री 11:30 वाजता संपेल. या काळात काही विशेष उपाय (Ram Navmi Upay) केल्यास श्रीरामाची कृपा होऊ शकते. त्यामुळे या दिवशी विशेष उपाय करावा, असा सल्ला दिला जातो.


कोणते उपाय कराल?


एका भांड्यात पाणी घ्या, ते पाणी हातात असताना ओम श्री हरीं रामचंद्राय श्री नमः या मंत्राचा उच्चार 108 वेळा करा. हे पाणी घरभर शिंपडल्याने घरात सुख शांती लाभते आणि वास्तू दोष निघून जातात.


राम नवमीच्या (Ram Navmi 2023) दिवशी खीर खाणं वैवाहिक जीवनात फायद्याचं ठरतं. खीर तयार करा, ती खीर चंद्राच्या प्रतिमेखाली तासभर ठेवा. थोड्या वेळाने पती पत्नीने खीर खाल्ल्याने प्रेमातील गोडवा वाढतो, असं म्हणतात.


प्रत्येकाच्या आयुष्यात दु:ख असतं. राम नवमीला रामाच्या प्रतिमेसमोर श्रीरामचंद्र कृपालु भजु मन या मंत्राचा वापर केला तर दु:खाचं निराकरण होतं, अशी मान्यता आहे.


आणखी वाचा - Ram Navami 2023 Date : कधी आहे रामनवमी? यंदा अत्यंत दुर्मिळ योग, जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त


दरम्यान, भगवान श्री राम हे भगवान विष्णूचे सातवे अवतार मानले जातात.  भगवान विष्णूने धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी त्रेतायुगात अवतार घेतला असं भावना भक्तांच्या मनात असते. त्यामुळे तुमच्याही आयुष्यातील समस्यांपासून सुटका करण्यासाठी नक्की उपाय करावेत.


(Disclaimer:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)