Shani-Surya Yuti: कुंभ राशीत सूर्य-शनीचा होणार संयोग; `या` राशींना मिळू शकतो भरपूर लाभ
Shani And Sun Conjunction 2024: फेब्रुवारीमध्ये सूर्यदेवही कुंभ प्रवेश करणार आहेत. यामुळे या दोन ग्रहांचा संयोग कुंभ राशीत होणार आहे. यावेळी काही राशीच्या लोकांना प्रगतीची संधी मिळणार आहे.
Shani And Sun Conjunction 2024: वैदिक ज्योतिषानुसार, ग्रहांच्या गोचरमुळे अनेकदा ग्रहांचा संयोग होतो. ज्योतिष्य शास्त्रामध्ये सूर्य देव शनीचा पिता मानला जातो. मात्र यावेळी दोघेही एकमेकांचे शत्रू आहेत. ज्यावेळी या दोन ग्रहांचा संयोग कोणत्याही राशीमध्ये तयार होतो तेव्हा ते त्यांचे अशुभ परिणाम देतात. सध्या शनीदेव कुंभ राशीत भ्रमण करतायत.
फेब्रुवारीमध्ये सूर्यदेवही कुंभ प्रवेश करणार आहेत. यामुळे या दोन ग्रहांचा संयोग कुंभ राशीत होणार आहे. यावेळी काही राशीच्या लोकांना प्रगतीची संधी मिळणार आहे. यामध्ये काही राशींच्या व्यक्तींना मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना यावेळी लाभ मिळणार आहे.
तूळ रास (Tula Zodiac)
सूर्य आणि शनीचा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यावेळी तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकणार आहे. तुम्हाला प्रलंबित पैसे मिळू शकतात. तुम्हाला तुमच्या मुलाकडून काही चांगली बातमी मिळू शकते. या काळात तुमचा आत्मविश्वासही वाढणार आहे. कुटुंबातील सर्वांशी संबंध सुधारतील आणि सुख-शांती नांदणार आहे. नवीन नोकऱ्यांसाठी ऑफर येऊ शकतात.
मिथुन रास (Mithun Zodiac)
मिथुन राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि शनीची जोडी अनुकूल ठरू शकणार आहे. यावेळी नशीब तुम्हाला साथ देणार आहे. तुमची प्रलंबित असलेली महत्त्वाची कामं पूर्ण होणार आहे. तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तुमची बँक बॅलन्स वाढल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. तुम्हाला फक्त मेहनत करावी लागेल.
कुंभ रास (Kumbh Zodiac)
सूर्य आणि शनीचा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. यावेळी तुमचं व्यक्तिमत्व सुधारणार आहे. तुमचा आत्मविश्वासही वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सर्वांशी संबंध सुधारणार आहेत. दीर्घकाळ प्रलंबित आणि रखडलेल्या कामांना गती मिळेल. कोणत्याही व्यवसायाशी संबंधित असलेल्यांना चांगला सौदा मिळू शकतो. करिअर आणि व्यवसायात यश मिळणार आहे.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )