Sun Saturn Conjunction: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रहांचा राजा सूर्य एका महिन्याच्या कालावधीनंतर राशी बदलतो. सूर्यदेवाचा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग होताना दिसतो. यावेळी सूर्याचा पुत्र शनिसोबत संयोग होणार आहे. या दोघांमध्ये शत्रुत्वाची भावना आहे. त्यामुळे या दोन्ही ग्रहांच्या संयोगाने काही राशींना त्रास होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुंभ राशीमध्ये शनि आणि सूर्याचा संयोग जवळपास 30 वर्षांनी होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 11 फेब्रुवारीला शनी अस्त आहे. यासोबतच 13 फेब्रुवारीला सूर्य कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत 14 मार्चच्या संध्याकाळी 6:04 पर्यंत शनी आणि सूर्याचा संयोग राहणार आहे.


कर्क रास (Kark Zodiac)


कर्क राशीच्या लोकांनी थोडे सावध राहणं आवश्यक आहे. या राशीच्या लोकांना मानसिक आणि शारीरिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही निष्काळजी राहिल्यास तुम्हाला आर्थिक नुकसानही सहन करावे लागू शकते. तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडूनही सहकार्य मिळणार नाही. व्यवसायाबद्दल थोडं सावधगिरीने पुढे जाणं महत्वाचे आहे. व्यवसायात काही समस्या निर्माण होऊ शकतात. 


सिंह रास (Singh Zodiac)


या राशीमध्ये सूर्य आणि शनीचा संयोग सप्तम भावात होणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी थोडे सावध राहणे आवश्यक आहे. व्यवसायात जास्त नफा मिळण्याची शक्यता नाही. आर्थिक परिस्थितीही थोडी कमकुवत होऊ शकते. आर्थिक व्यवहारात काही अडचणी येऊ शकतात. नोकरदार लोकांना सहकाऱ्यांकडून काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. 


कुंभ रास (Kumbha Zodiac)


शनि आणि सूर्याचा संयोग पहिल्या घरात होणार आहे. वैवाहिक जीवनातही काही कलह निर्माण होऊ शकतो. कामाचा ताण जास्त असणार आहे. सहकाऱ्यांमुळेही तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुम्हाला आर्थिक नुकसानही सहन करावं लागू शकते. कोणालाही पैसे उधार देणं टाळा कारण तुमचे पैसे परत मिळणे खूप कठीण आहे.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)