Sun Transit In Mesh: वैदिक ज्योतिश्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रहांच्या या गोचरचा परिणाम प्रत्येक राशीच्या व्यक्तीवर पडतो. यावेळी ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो. सध्या सूर्य सध्या मीन राशीत आहे. 13 एप्रिल रोजी रात्री 9:15 वाजता सूर्य मेष राशीत प्रवेश करणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी 14 मे रोजी संध्याकाळी 6:04 पर्यंत सूर्य या राशीत राहणार आहे. यानंतर तो वृषभ राशीत प्रवेश करेल. सूर्याने उच्च राशीत प्रवेश केल्याने अनेक राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो. यावेळी काही लोकांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येणार आहेत, तर काही राशींना कौटुंबिक सुख मिळणार आहेत. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.


मिथुन रास (Mithun Zodiac)


या राशीमध्ये सूर्य अकराव्या भावात प्रवेश करणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होणार आहेत. नोकरदार लोकांना त्यांच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे फळ मिळू शकते. पदोन्नतीसह पगार वाढू शकतो. तुमच्या कामाची प्रशंसाही होऊ शकते. नफा मिळवण्यासाठी नवीन कल्पनांवर काम करा. कुटुंबात सुरू असलेल्या समस्यांपासून सुटका मिळू शकते. या काळात व्यावसायिक गरजांसाठी विविध सहलींची शक्यता असून या सहली तुमच्यासाठी शुभ ठरतील. 


कर्क रास (Kark Zodiac)


कर्क राशीच्या दहाव्या घरात सूर्याचे भ्रमण आहे. या राशीचे लोक त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाने त्यांच्या वरिष्ठांना आश्चर्यचकित करू शकतात. तुमचं ध्येय साध्य करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. कामाच्या ठिकाणी तुम्ही सांगितलेले कल लोकांना आवडू शकतात. सर्जनशीलता आणि एकाग्रता वाढेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेले लोकही यश मिळवू शकतात. 


धनु रास (Dhanu Zodiac)


सूर्याच्या गोचरमुळे या राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंदच येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. मात्र अनावश्यक खर्च टाळावा. पदोन्नती किंवा पगार वाढ यासारखे काही फायदे मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होणार आहे. उत्पन्नाचे नवे स्त्रोत खुले होणार आहेत.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)