Sunday Upay : आर्थिक विवंचनेमुळे जीवनात निराशा येऊ लागली? आजच करा `हे` 3 चमत्कारी उपाय
Sunday Upay : कायम पैशांची चणचण जाणवते. आर्थिक संकटाशी तुम्हाला सामना करावा लागत आहे. मग आजचा दिवस आहे खास...कारण शास्त्रात रविवारच्या दिवशी आर्थिक संकटावर मात करण्यासाठी उपाय सांगण्यात आले आहे.
Sunday Upay in marathi : हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आला आहे. आज रविवार म्हणजे आजचा दिवस हा सूर्य देवाला (Surya Dev) समर्पित करण्यात आला आहे. हिंदू धर्मात रोज ब्रह्म मुहूर्तावर उठल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करणे हे शुभ मानलं जातं. रविवार म्हटलं की आपण आरामात उठतो. पण रविवारी लवकर उठल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण केल्यास विशेष शुभ फळ मिळतो. याशिवाय ज्योतिषशास्त्रानुसार (tips to brighten your luck) आर्थिक विवंचनेवर मात करण्यासाठी 3 चमत्कारी उपाय सांगण्यात आले आहेत. ज्यामुळे घरात आनंद राहतो आणि संपत्ती (Money problem) आकर्षित होते. (Sunday Upay Raviwar ke Totke or Raviwar ke upay for money Surya Dev Worship in marathi)
रविवारचे उपाय (sunday remedy)
पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा
झोपलेले नशीब जागे करायचे असेल तर रविवारी (Raviwar Ke Upay) पिंपळाच्या झाडाखाली पिठाचा चारमुखी दिवा लावा. त्या दिव्यात मोहरीचं तेल भरावं, असे केल्याने शुभ लाभ होतो. यासोबतच एका मोठ्या वटवृक्षावर जा आणि तिथून झाडाचं पान आणा. आता या पानावर तुमची इच्छा लिहा. त्यानंतर ते पान वाहत्या पाण्यात टाकल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे.
बाभळीच्या झाडाला दूध अर्पण करावे
ज्योतिषांच्या मते, जीवनात धन-समृद्धी मिळविण्यासाठी रविवारी (Raviwar Ke Totke) दुधाचा उपाय करावा. यासाठी रविवारी दिवसभरात सूर्यदेवाची पूजा (tips to brighten your luck) करावी आणि त्यांच्या मंत्रांचा जप करावा. रात्री एक ग्लास दूध डोक्याजवळ ठेवून झोपा. दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी उठल्यावर ते दूध बाभळीच्या झाडाच्या मुळाशी टाकावं. असं मानलं जातं की असं केल्याने घरात पैशांची आकर्षित होतो.
रविवारी झाडू खरेदी करा
हिंदू धर्मात झाडूमध्ये माता लक्ष्मीचं वास असतं असं मानलं जातं. त्यामुळे शास्त्रात रविवारी (Sunday Upay) झाडू खरेदी करणे शुभ मानलं जातं. तुम्ही रविवारी 3 झाडू खरेदी करा आणि घरी आणा. दुसऱ्या दिवशी सोमवारी ते तीन झाडू तुमच्या जवळच्या मंदिरात दान करा. असं म्हणतात की या उपायाने व्यक्तीचे भाग्य उजळते आणि आर्थिक तंगीतून सुटका होते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)