Surya Gochar 2023: सूर्य देव करणार वृषभ राशीत प्रवेश; `या` राशींच्या व्यक्तींचं नशीब उजळणार
Surya Gochar 2023: सूर्य देव 15 मे 2023 रोजी त्यांची राशी बदलणार आहेत. सूर्य गोचर करून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे.
Surya Gochar 2023: सूर्याचा गोचर (Surya Gochar) हे फार खूप खास मानला जातं. मुळात सूर्य दर महिन्याला त्याची राशी बदलत असतो. वर्षभरात सूर्य एकूण 12 वेळा त्याची राशी बदलतो. त्यानुसार आता लवकरच सूर्य त्याची राशी बदलणार आहे. 15 मे रोजी सूर्य गोचर करून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. तब्बल एका वर्षानंतर सूर्य वृषभ राशीत प्रवेश करणार आहे.
सूर्यावर सिंह राशीचा स्वामीत्व असतं. 15 मे 2023 रोजी सकाळी 11.32 वाजता सूर्य राशी बदलणार आहे. सूर्याच्या राशीतील बदलाचा सर्व 12 राशींवर परिणाम होणार आहे. सूर्य गोचरला संक्रांती असंही म्हटलं जातं. दरम्यान यंदाच्या सूर्य गोचरमुळे 4 राशींना जास्त लाभ होणार आहे. या राशी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊया.
सिंह रास
सूर्याच्या गोचरमुळे या राशीतील व्यक्तींना चांगला लाभ होणार आहे. या व्यक्तींचा समाजात मान-सन्मान वाढणार आहे. तसंच यापूर्वी ज्या गोष्टींमध्ये अपयश मिळत होतं तिथे यंदा नक्की यश मिळणार आहे. करिअरच्या चांगल्या संधी उपलब्ध होणार आहेत. बिझनेसमध्ये भरपूर नफा मिळण्याचे संकेत आहेत. तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. तुम्ही ठरवलेल्या गोष्टी पूर्ण होऊ शकतात.
वृषभ रास
सूर्य गोचरचा या राशीच्या राशीच्या व्यक्तींना खूप फायदा होणार आहे. या काळामध्ये या व्यक्तींच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय व्यापाराच्या तसंच नोकरदारांना नवीन संधी मिळू शकणार आहेत. तुम्हाला धनलाभ होण्याची देखील शक्यता आहे. अडकलेली सर्व कामं मार्गी लागणार आहेत.
कन्या रास
सूर्य हा या राशीच्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये 9व्या घरात प्रवेश करणार आहे. यावेळी या राशीच्या व्यक्तींचा कल अध्यात्माच्या दिशेने वाढण्याची शक्यता आहे. जर तुमचा कोणाशी वाद असेल तर तो मिटू शकणार आहे. तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणार होणार आहे.
मकर रास
मकर राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचं गोचर चांगले दिवस आणणार आहे. यामुळे या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात यशाचा काळ सुरु होणार आहे. शिवाय बिझनेसमध्ये भरपूर नफा मिळणार असून पैसे घरी येऊ शकतात. आर्थिक स्थिती मजबूत व्हायला सुरुवात होणार आहे. कोणत्याही कठीण काळात वडिलांचं पूर्णपणे सहकार्य मिळू शकणार आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)