Surya Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या ठरावीक वेळेनुसार एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. नऊ ग्रहांचा राजा सूर्यदेव हा आत्म्याचा कारक मानला जात असून सूर्य एक महिन्यांसाठी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. मंगळवारी 14 मे 2024 रोजी संध्याकाळी 5:54 वाजता सूर्य वृषभ राशीत गोचर करणार आहे. सूर्यदेव वृषभ राशीत एक महिना 14 जून रोजी दुपारी 12:28 पर्यंत राहणार आहे. सूर्य गोचर काही राशींसाठी आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरणार आहे, असं ज्योतिषचार्य आनंद पिंपळकर यांनी भाकीत केलंय. (Surya Gochar 2024 sun transit in taurus Some job promotion with huge financial benefits for these zodiac signs)


मेष रास (Aries Zodiac)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूर्यदेवाचं संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. या राशीच्या कुंडलीत सूर्यदेव धन आणि वाणीच्या घरात आहे. त्यामुळे या लोकांना अनपेक्षित धन लाभ होणार आहे. तुमचे प्रलंबित कामंही सहज मार्गी लागणार आहे. व्यवसायिक नवीन करार करुन नफा कमावणार आहेत. तसंच, तुमच्या बोलण्याचा प्रभाव लोकांवर पडणार आहे. 


वृश्चिक रास (Scorpio Zodiac)   


वृश्चिक राशीच्या कुंडलीत सूर्य सातव्या घरात असल्याने या लोकांसाठी सूर्यदेवाचे संक्रमण शुभ सिद्ध होणार आहे. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन अद्भूत असणार आहे. तसंच, गेल्या काही दिवसांपासून नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना त्यांच्या आवडीचे नोकरी मिळणार आहे. या काळात अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येणार आहे. तसंच, नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या करिअरमधील कामामुळे कामाच्या ठिकाणी कौतुक होणार आहे. 


कन्या रास (Virgo Zodiac)    


सूर्य देवाच्या राशीतील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे कारण सूर्यदेव या राशीच्या नवव्या घरात विराजमान आहे. त्यामुळे यावेळी नशीब तुम्हाला साथ मिळणार आहे. तसंच या काळात तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होणार आहात. तुम्हाला व्यवसायात भरपूर पैसे कमावण्याच्या संधी मिळणार आहे. नोकरदार लोकांना आर्थिक लाभासह पदोन्नतीही मिळणार आहे. तसंच, तुम्ही काम-व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी देश-विदेशातही प्रवास करणार आहात. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)