Surya Gochar 2022: ग्रहांचा राजा सूर्यदेव 16 नोव्हेंबर 2022 रोजी तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य दर महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश (Surya Gochar 2022) करतात. या राशी परिवर्तनामुळे सर्व 12 राशींवर परिणाम दिसून येतो. काही राशींवर शुभ तर काही अशुभ परिणाम होणार आहे. सूर्याच्या गोचरामुळे पाच राशींना चांगली फळं मिळणार आहे. त्याचबरोबर आर्थिक मार्गही खुले होणार आहेत. चला जाणून घेऊयात वृश्चिक संक्रांती कोणत्या राशींसाठी लाभदायी ठरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्क- वृश्चिक राशीतील सूर्यप्रवेश कर्क राशीसाठी लाभदायी ठरणार आहे. सूर्याचं पाठबळ या राशीला मिळणार आहे. करिअरसाठी ही वेळ चांगली असणार आहे. या काळात आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबासोबत प्रवासाचा योग जुळून येईल. 


सिंह- सूर्य गोचर सिंह राशीसाठी लाभदायी ठरेल. जीवनात सुख समृद्धी वाढेल. गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. कामाच्या ठिकाणी बॉसकडून कौतुकाची थाप मिळेल. या काळात अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. 


तूळ- सूर्य या राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. गोचर कुंडलीत दुसऱ्या स्थानात सूर्य असणार आहे. या स्थानाला धनस्थान म्हंटलं जातं. त्यामुळे या काळात आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. नव्या जॉबची ऑफर मिळू शकते. 


Shani Gochar 2023: शनिदेवांची पुढच्या वर्षात कोणावर असेल कृपा, गोचर कालावधी काय? जाणून घ्या


वृश्चिक- सूर्यदेव या राशीतच प्रवेश करणार आहेत. त्यामुळे या राशीसाठी हा काळ अनुकूळ ठरणार आहे. नोकरी आणि व्यापारात यश मिळेल. पदोन्नती आणि मानसन्मान वाढेल. आरोग्याशी निगडीत समस्या दूर होतील.


कुंभ- या राशीच सूर्य गोचर कालावधी लाभदायी ठरणार आहे. या काळात आर्थिक स्थिती सुधारेल. प्रमोशन मिळण्याचा योग प्रबळ आहे. तुमच्या कामाचं कौतुक होईल. कामाच्या ठिकाणी मानसन्मान मिळेल. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)