Surya Grahan, sutak kaal 20222: आज म्हणजेच 25 ऑक्टोबरला या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण (solar eclipse) आहे. भारतात ग्रहण सायंकाळी 4 वाजून 22 मिनिटांनी सुरु होणार आहे. हे ग्रहण देशात 5 वाजून 42 मिनिटांपर्यंत असेल. सर्वप्रथम ग्रहण श्रीनगरमधून दिसणार आहे. दरम्यान ग्रहणापूर्वी पहाटे 4 वाजून 22 मिनिटांपासूनच सूतक काळ (sutak kaal) लागला आहे. आजचं ग्रहण भारतातून दिसणार असलं तरीही विविध ठिकाणहून ते वेगवेगळ्या वेळी दिसणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना असली तरी हिंदू धर्मात ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे (importance of solar eclipse in hindu mythology). ग्रहणाकडे वैज्ञानिक आणि धार्मिक दृष्टीकोनातून पाहिलं जात आहे. जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत येतात, तेव्हा सूर्यग्रहण होतं. यामुळे सूर्याची किरणं पृथ्वीवर पोहोचत नाहीत.  (Surya Grahan 2022 don't do this things in sutak kaal will give you problem )


ग्रहणाच्या आधीच काळ म्हणजे सुतक काळ (sutak kal before solar eclipse) अतिशय अशुभ मानला जातो (एक्लिप्स सुतक काळ ). हिंदू धर्मियांची अशी धारणा आहे की सूर्य ग्रहणातील हा सुतक काळ अतिशय अशुभ आहे .सुतक काळात कुठलाही मांगलिक कार्य करू नये असं सांगितलं जात तसच या काळात व्यक्तीने कोणतंही नवीन काम हाती घेऊ नये आणि ते करू नये असही म्हटलं जात. (Surya Grahan 2022 don't do this things in sutak kaal will give you problem )
 
या सुतक काळात काही गोष्टींचं विशेष लक्ष देणं खूप महत्वाचं आहे . 


सुतक काळात काय करू नये : 
सुतक काळात कोणतंही शुभ काम हाती घेऊ नका . या काळातअन्न  शिजवू नये आणि शिजलंच तरी त्यात तुळशीची पान टाकून ठेवा ,ग्रहण असो  किंवा सुतक काळ देवाच्या मूर्तीला स्पर्श करणं वर्ज्य मानलं जात. व्यक्तींनी सुतक काळात खाणं-पिणं,  झोपणं , नख कापणं ,  जेवण बनवणं , केस कापणं,  किंवा स्वतःचे केस कापून घेणे,  किंवा शारीरिक संबंध प्रस्थापित करणं वर्ज्य मानलं आहे त्यामुळे या गोष्टी चुकणंही करू नका. (does and don'ts in surya grahan)


सुतक काळ सुरु होण्याआधी  जेवणाचे पदार्थ जसे कि दूध, दही, चटणी,लोणचं यात कुश ठेवले जाते त्यामुळे ग्रहण समयी पदार्थ दूषित होत नाहीत. जर कुश नसेल तर तुळशीची पान ठेऊ शकतो.  घरातले इतर पदार्थ जे सुके खाऊ म्हणतो त्यात तुळशीचं पान टाकण्याची गरज नाही . सुतक काळात दात घासणे केस विंचरणे सर्व निषिद्ध आहे. या काळात देवाच्या मंदिराचे दरवाजे बंद करावेत..


त्यानंतर ग्रहण कालावधी संपल्यावर स्वच्छ अंघोळ करून देवघर किंवा मंदिर स्वच्छ करून मग देवाची पूजा करावी. सुतक काळात चुकूनही खोटं बोलू नका,  ग्रहण सुतक काळात  लहान मूळ गर्भवती  वयोवृद्ध व्यक्ती  आजारी व्यक्ती यांनी जेवण किंवा औषध घेण्यात काहीच समस्या नाही. त्याने कुठलाही दोष लागणार नाही.  सुतक काळात  शक्य असल्यास तेवढं झोपलं नाही तर उत्तम . 


आजारी व्यक्ती, वयोवृद्ध यांच्यासाठी हा सुतककाळ दुपारी 12 वाजून 05 मिनिटांनी सुरू होणार आहे तर संध्याकाळी तो 5 वाजून 42 मिनिटांनी संपणार आहे.  (Surya Grahan 2022 don't do this things in sutak kaal will give you problem )