Surya Grahan Sutak Kaal Time : आज म्हणजेच 25 ऑक्टोबरला या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण आहे. भारतात ग्रहण सायंकाळी 4 वाजून 22 मिनिटांनी सुरु होणार आहे. हे ग्रहण देशात 5 वाजून 42 मिनिटांपर्यंत असेल. सर्वप्रथम ग्रहण श्रीनगरमधून दिसणार आहे. दरम्यान ग्रहणापूर्वी पहाटे 4 वाजून 22 मिनिटांपासूनच सूतक काळ लागला आहे. आजचं ग्रहण भारतातून दिसणार असलं तरीही विविध ठिकाणहून ते वेगवेगळ्या वेळी दिसणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुठे दिसणार पूर्ण ग्रहण?


दिल्ली, राजस्थान (Rajasthan), पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, जम्मू, श्रीनगर, लेह आणि लडाख या भागांमध्ये पूर्ण ग्रहण दिसणार आहे.


कुठे दिसणार आंशिक ग्रहण?


तमिळनाडू (Tamilnadu), कर्नाटक, मुंबई (Mumbai), आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, बिहार, छत्तीसगढ़, झारखंड आणि बंगालमध्ये ग्रहण आंशिक स्वरुपात दिसणार आहे. तर, आसम, अरुणाचल प्रदेश, मणिपुर आणि नागालँडमध्ये ग्रहण अजिबात दिसणार नाही.


अधिक वाचा : Horoscope 25 october : 'या' राशीच्या व्यक्तींना विविध स्तरावर अडचणींचा सामना करावा लागेल!


देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये ग्रहणाच्या वेळा


- दिल्लीमध्ये (Delhi) सूर्यग्रहण 1 तास 14 मिनिटांसाठी पाहता येणार आहे. सायंकाळी 4 वाजून 28 मिनिटांपासून 5 वाजून 42 मिनिटांपर्यंत हे ग्रहण दिसेल.


- मुंबईत (Mumbai) सायंकाळी सायंकाळी 4 वाजून 49 मिनिटांपासून 6 वाजून 09 मिनिटांपर्यंत ग्रहण दिसणार आहे.


- कोलकाता (Kolkata) येथे ग्रहण सायंकाळी 4 वाजून 42 मिनिटांपासून सुरु होऊन अवघी 12 मिनिटं दिसणार आहे. वादळामुळं तिथे ग्रहण फार काळ दिसणार नाही.


- चेन्नईमध्ये (Chennai) सूर्यग्रहण सायंकाळी 5 वाजून 13 मिनिटांपासून 5 वाजून 45 मिनिटांपर्यंत असेल.


- रांचीमध्ये ग्रहण 26 मिनिटं दिसणार आहे. सायंकाळी 4 वाजून 48 मिनिटांपासून ग्रहण सुरु होऊन 5 वाजून 15 मिनिटांपर्यंत सुरु असेल.


कोणत्या राशींवर असेल ग्रहणाचा परिणाम?


मेष, वृषभ, मिथुन, कर्क या राशींमध्ये ग्रहणाचे सकारात्मक परिणाम दिसणार नाहीत. सिंह आणि धनू या राशींवर ग्रहणाचे शुभ परिणाम दिसून येतील. तर मकर राशीसाठी ग्रहणाचा काळ आनंददायी असेल. कुंभ राशीसाठीसुद्धा ग्रहण काळ वाईट नाही. मीन राशी असणाऱ्यांनी मात्र सावध राहावं.


(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)