Surya Grahan 2023 : वर्षातील पहिले सूर्यग्रहण पुढील महिन्यात, `या` 4 राशींच्या लोकांच्या आयुष्यात उभे राहणार मोठे संकट
Surya Grahan 2023 : जानेवारीपासून 2023 हे नवीन वर्ष सुरु झाले. या वर्षातील पहिले सूर्यग्रहण एप्रिलमध्ये होणार आहे. या ग्रहणाचा काही राशींवर मोठा प्रभाव पडणार आहे. त्यामुळे त्यांना संकटाचा सामना करावा लागू शकतो. कोणत्या राशींच्या लोकांना त्रास होणार ते अधिक जाणून घ्या.
Surya Grahan 2023 : वर्षातील पहिले सूर्यग्रहण हे एप्रिल महिन्यात होणार आहे. हे ग्रहण 4 राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक संकटे आणणारे आहे. त्यामुळे या राशींच्या लोकांनी काही उपाय करणे आवश्यक आहे. जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्यामध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होते. ही सामान्य प्रक्रिया आहे. या वर्षातील पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिल रोजी होणार आहे. यावेळी खग्रास सूर्यग्रहण असणार आहे. भारतासह दक्षिण आशियातील काही देश सोडले तर उर्वरित जगात दिसणार आहे.
ग्रहण कधी सुरु होणार?
भारतातून दिसणारे हे खग्रास सूर्यग्रहण हे 20 एप्रिल रोजी सकाळी 7.5 वाजता सुरु होईल. हे ग्रहण दुपारी 12.29 वाजता सुटणार आहे. हे ग्रहण एकूण 5 तास 24 मिनिटांचे असणार आहे. दरम्यान, भारतात दिसत नसल्यामुळे येथे सुतक कालावधी होणार नाही. हे सुतक तिथे सापडते आणि भारतात दिसणार नाही. त्यामुळे सूर्यग्रहणापूर्वीचा सुतक काळ वैध ठरणार नाही. ज्या ठिकाणी ग्रहण दिसेल तिथेच सुतक असणार आहे. दरम्यान, या ग्रहणाचा 4 राशींवर त्याचा विपरीत परिणाम दिसून येणार आहे, त्यामुळे त्यांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. त्यासाठी काही उपायही केले तर त्यांच्यामागील शुल्ककाष्ठ कमी होईल.
सूर्यग्रहणाचा कोणत्या राशींवर प्रभाव पडणार?
मकर
खग्रास सूर्यग्रहणाचा मकर राशीवर प्रभाव दिसून येणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी जरा जपून राहणे आवश्यक आहे. मकर राशीचा विचार करता त्यांच्या कुंडलीच्या चौथ्या घरात सूर्यग्रहण होईल. त्यामुळे त्यांना आजारांना निमंत्रण मिळू शकते. नोकरीच्या किंवा कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. तर उत्पन्नाच्या तुलनेत तुमचे खर्च वाढेल. कुटुंबात आपल्या सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतो.
कन्या
सूर्यग्रहण भारतात दिसणार नसले तरी कन्या राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण डोकेदुखी ठरणार आहे. गाडी चालवताना सावधानता बाळगावी लागेल. एकाद्या अपघाताची शक्यता आहे. तसेच मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. आपल्या बोलण्यावर ताबा ठेवा. तुमच्या बोलण्याने एखाद्याचे मन दुखावले जाऊ शकते. त्यामुळे बोलताना विचार करा. तसेच पैसे खर्च करताना विचार करा, अन्यथा अनावश्यक खर्च जास्त होईल.
वृश्चिक
वृश्चिक राशींच्या लोकांनासाठी हे सूर्यग्रहण प्रभावी दिसून येत आहे. या सूर्यग्रहणामुळे आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवऊ शकतात. तुमचे आर्थिक गणित बिघडू शकते. त्यामुळे तुमची आर्थिक ओढाताण होऊल. इन्कम मिळण्यात अडचन निर्माण होऊ शकते. विरोधक सक्रीय होऊ शकतात. त्यामुळे त्यांच्यापासून तुम्हाला धोका आहे. कर्जाच्या नादात पडू नका, अन्यथा त्याच्या चक्रव्युहात अडकाल. काही कामे रखडण्याचीही शक्यता आहे.
मेष
सूर्यग्रहण मेष राशींच्या लोकांसाठी त्रासदायक ठरणार आहे. या राशीच्या लोकांनी जरा जपून बोलले पाहिजे. शेजाऱ्यांशी भांडण होऊ शकते. वाहन चालवताना काळजी घ्या. अपघाताची शक्यता आहे. कुटुंबात तुमचे मतभेद होण्याची शक्यात आहे. तर आरोग्याबाबत काही समस्या डोकेवर काढतील. दरम्यान, सूर्यग्रहण संपल्यानंतर गुरु ग्रह मेष राशीत प्रवेश करेल, त्यानंतर तुमचे दिवस पालटतील. त्यामुळे भविष्यात अच्छे दिन असणार आहेत.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)