Surya Grahan 2024 : तब्बल 50 वर्षांनंतर गुढीपाडव्यापूर्वी अत्यंत दुर्मिळ सूर्यग्रहण, 7.5 मिनिटं पूर्ण अंधार
Solar Eclipse 2024 : गुढीपाडव्यापूर्वी या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण असणार आहे. तब्बल 50 वर्षांनंतर हे अत्यंत दुर्मिळ सूर्यग्रहण असून सूर्यग्रहण तारीख, वेळ, सुतक वेळ, भारतात ग्रहण कुठे दिसेल संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Surya Grahan 2024 Date Time in india : या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे गुढीपाडव्यापूर्वी फाल्गुन अमावस्येला असणार आहे. चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण ही खगोलीय घटना असून त्याला ज्योतिषशास्त्रात अतिशय महत्त्व आहे. या वर्षांतील पहिलं सूर्य ग्रहण हे येत्या सोमवारी 8 एप्रिल 2024 ला असणार आहे. यादिवशी सोमवती अमावस्या आहे. सूर्यग्रहण वेळ, सुतक वेळ, भारतात ग्रहण कुठे दिसेल याबद्दल जाणून घ्या. (Surya Grahan 2024 After almost 50 years very rare solar eclipse before Gudi Padva 7 minutes total darkness)
अत्यंत दुर्मिळ सूर्यग्रहण
या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे अंत्यत दुर्मिळ असणार आहे. हे खग्रास सूर्यग्रहण असून 1973 नंतर पहिल्यांदाच ग्रहणामुळे 7.5 मिनिटं सूर्य दिसणार नाही. वैज्ञानिकांनुसार यादिवशी पृथ्वीचा एक भाग पूर्णपणे अंधारमय होतो. यावेळी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ येतो. या सूर्यग्रहणादरम्यान सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात. (Solar eclipse date time Sutaka time where will the eclipse be seen in India know complete information)
सूर्यग्रहणाची वेळ काय?
भारतीय वेळेनुसार, सूर्यग्रहण 8 एप्रिलला रात्री 9.12 वाजेपासून पहाटे 1.20 वाजेपर्यंत असणार आहे. सूर्यग्रहणाचा कालावधी हा 05 तास 10 मिनिटं एवढा असणार आहे.
सूर्यग्रहण भारतात दिसणार का?
या वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणानुसार वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे भारतात दिसणार नाही. त्यामुळे सूर्यग्रहणाचा सूतक कालावधी भारतात वैध नसणार आहे.
हेसुद्धा वाचा - Gudi Padwa 2024 : गुढी पाडव्याला खरेदी करण्याची परंपरा का आहे?
कुठे दिसणार वर्षातील सूर्यग्रहण ?
उत्तर अमेरिका, कॅनडा, मेक्सिको आणि न्यूफाउंडलँडच्या काही भागात हे ग्रहण स्पष्टपणे पाहता येणार आहे. त्याशिवाय कोस्टा रिका, क्युबा, डॉमिनिका, फ्रेंच पॉलिनेशिया, जमैका, आयर्लंड, इंग्लंडचा वायव्य प्रदेश, पश्चिम युरोप, पॅसिफिक, अटलांटिक, आर्क्टिक या भागातही पाहता येणार आहे.
नासा करणार थेट प्रेक्षपण
अमेरिकन अंतराळ संस्था नासा सूर्यग्रहणाचं थेट प्रेक्षपण YouTube वर करणार आहे, असं जाहीर केलंय. हे प्रेक्षपण तुम्हाला 8 एप्रिलला सकाळी 10:30 वाजेपासून 9 एप्रिलपर्यंत सकाळी 1:30 वाजेपर्यंत पाहता येणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहणासंबंधीत काही श्रद्धा
सूर्यग्रहण काळात एकट्याने कोणत्याही निर्जन ठिकाणी किंवा स्मशानभूमीत जायचं नाही कारण तिथे नकारात्मक शक्तीचा वास असतो. त्याशिवाय सूर्यग्रहण काळात झोपू नये आणि सुई धागा घेऊन शिवण काम करु नयेत. याशिवाय ग्रहण काळात प्रवास करु नयेत. तसंच गर्भवती महिलांनी ग्रहण काळात विशेष काळजी घ्यावी. तर सूर्यग्रहणानंतर गंगाजलाने स्नान करुन संपूर्ण घर आणि देवी-देवतांची शुद्धी करावी. ग्रहण काळात सूर्याकडे थेट पाहू नये. ग्रहणानंतर हनुमानाची पूजा आवश्य करावी.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)