Surya Parivartan: 16 जुलैला सूर्य करणार कर्क राशीत प्रवेश, `या` राशींचं नशिब फळफळणार
ग्रहांच्या गोचराप्रमाणे सूर्यदेव दर महिन्याला राशी बदल करतात. आता सूर्यदेव 16 जुलैला राशी परिवर्तन करणार आहेत.
Surya Parivartan 2022: सूर्यदेवांना ग्रहांचा राजा म्हणून संबोधलं जातं. ग्रहांच्या गोचराप्रमाणे सूर्यदेव दर महिन्याला राशी बदल करतात. आता सूर्यदेव 16 जुलैला राशी परिवर्तन करणार आहेत. सूर्यदेव मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. या परिवर्तनाला कर्क संक्रांती संबोधलं जातं. हे राशी परिवर्तन रात्री 11 वाजून 11 मिनिटांनी होणार आहे. या गोचराचा सर्वच राशींवर परिणाम होईल. मात्र मिथुन, कर्क, तूळ आणि मीन राशींना हे गोचर लाभदायी ठरेल.
मिथुन- तुमच्या राशीच्या दुसऱ्या स्थानात म्हणजेच धनस्थानात सूर्य येत आहे. हा कालावधी तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो. पगारदार लोकांना पदोन्नती आणि प्रोत्साहन मिळू शकतो. बँक बॅलन्स वाढेल. गुंतवणूक करणाऱ्यांना दीर्घकाळ लाभ मिळेल
कर्क- सूर्याचे संक्रमण तुमच्याच राशीत होणार आहे. या काळात तुम्ही उत्पन्न वाढण्याची अपेक्षा आहे. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी काळ अनुकूल आहे. म्हणजेच त्यांना इच्छित नोकरी मिळवण्यात यश मिळू शकते.
तूळ- नवीन करिअर सुरू करण्याचा विचार करत आहात, त्यांना या काळात यश मिळण्याची शक्यता आहे. पगारदार लोकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रशंसा आणि प्रसिद्धी मिळेल. या काळात व्यावसायिकाला त्याच्या व्यवसायात प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी मिळणार आहे.
मीन- विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील. तुम्ही परीक्षा पास व्हाल आणि चांगल्या गुणांसह पुढे जाल. कष्ट करणाऱ्यांना नोकरीत यश मिळेल. मुलांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)