मुंबई : अनेकदा आपण स्वप्नात दिसणार्‍या गोष्टींचा संबंध वास्तविक जीवनाशी जोडतो. पण स्वप्नात दिसणार्‍या गोष्टींचा खरंच आपल्या जीवनावर काही परिणाम होतो का? स्वप्नातील शास्त्रांमध्ये झोपेची अनेक रहस्यं दडलेली असतात. स्वप्नात दिसणार्‍या प्रत्येक गोष्टीचा नक्कीच काही ना काही अर्थ असतो, फक्त तो समजून घेणं आवश्यक असतं. हे समजून घेतल्यावरच ते स्वप्न शुभ की अशुभ हे समजू शकेल.


साप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये एखादा साप तुमच्या दिशेने येताना दिसला तर समजून घ्या की तुमचा कोणीतरी शत्रू जवळ येतोय. हे लोकं तुमच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे त्यांच्या कपटीपणासून सावध राहिलं पाहिजे.


नववधू


जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात वधू दिसत असेल तर याचा अर्थ असा आहे की, तुम्ही विरोधी व्यक्तीशी तडजोड करणार आहात. म्हणजेच वाद झाल्यानंतर परस्पर संमतीने त्यावर तोडगा निघू शकतो.


घोड्यावरून पडताना पाहणं


जर तुम्ही तुमच्या स्वप्नात घोड्यावरून पडतानाच स्वप्न पाहत असाल तर ते तुमच्या आयुष्यात लवकरच काही आर्थिक समस्या येण्याची चिन्हं आहे. स्वप्न शास्त्रानुसार, अशा पद्धतीचं स्वप्न पाहणं हे एखाद्या प्रकारच्या शारीरिक दुखापतीचंही संकेत असू शकतं.


(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)