या वयाच्या मुली करतात सर्वात जास्त ऑनलाईन खरेदी
दिवाळीचा उत्सव काही दिवसांवरच आला आहे. खरेदीसाठी बाजारपेठा सजल्या आहेत. अशात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध कंपन्या आणि ई-कॉर्मस कंपन्या अनेक ऑफर्स देत आहेत.
नवी दिल्ली : दिवाळीचा उत्सव काही दिवसांवरच आला आहे. खरेदीसाठी बाजारपेठा सजल्या आहेत. अशात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध कंपन्या आणि ई-कॉर्मस कंपन्या अनेक ऑफर्स देत आहेत.
यंदाच्या उत्सवात ऑनलाईन खरेदीवर ३० कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. उद्योग मंडळ एसोचॅमकडून करण्यात आलेल्या सर्व्हेतून ही बाब समोर आली आहे.
सर्व्हेतून समोर आले आहे की, दिवाळी सीझनमध्ये ग्राहक मुख्यत्वे मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, कपडे आणि फर्निचरची ऑनलाईन खरेदी करतात. हा सर्व्हे दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू, चंढीगड आणि देहरादून मध्ये करण्यात आलाय.
सर्व्हेनुसार, वर्षभर ऑनलाईन खरेदी करणा-यांमध्ये ६५ टक्के पुरूष आणि ३५ टक्के महिला आहेत. तर उत्सवाच्या सीझनमध्ये २५ ते ३४ वर्ष पुरूष आणि महिला ऑनलाईन खरेदीत पुढे असतात. यातही खरेदी करणा-यात मुलींची संख्या अधिक असते.