मुंबई : व्हेलेंटाईने डेच्या दिवशी तुम्ही जर तुमच्या पार्टनरला गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर ही बातमी वाचा. राशीनुसार कोणी कोणतं गिफ्ट द्यावं याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


राशीनुसार कोणतं गिफ्ट द्यावं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष: या राशीच्या लोकांना गोल्डन, गुलाबी, नारंगी, पांढरं किंवा लाल रंगाचं गिफ्ट द्या. यामुळे तुमची इच्छा पूर्ण होईल.


वृषभ : या राशीच्या लोकांना गुलाबाला सोडून इतर कोणतीही लाल वस्तू देऊ नका. या व्यक्तींना गुलाबी, पांढरी, क्रीम, खाकी रंग आवडतो. त्यामुळे त्यांना या रंगाचं गिफ्ट द्या.


मिथून : बुद्धीने हुशार असा या लोकांना पांढरा, लाल किंवा पिंक रंग आवडतो. यांना तुम्ही काळ्या रंगाची वस्तू देखील भेट देऊ शकता.


कर्क : या राशीच्या लोकांना तुम्ही हिरवा, पिवळा रंगाचं गिफ्ट देऊ शकता. तुम्ही हिरव्या रंगाच्या कागदात पॅक करुन देऊ शकता.


सिंह : या राशीचे लोकं खूपच महत्त्वकांक्षी असतात. त्यामुळे यांना रॉयल गिफ्ट दिलं पाहिजे. पांढऱ्या किंवा गोल्डन रंगाचं गिफ्ट तुम्ही देऊ शकता.


कन्या : या राशीच्या लोकांना इंम्प्रेस करण्यासाठी तुम्ही हिरवा, काळा, आकाशी, पिंक रंगाचं गिफ्ट देऊ शकतात.


तुला : या राशीचे लोकं अध्यात्मिक असतात. तुम्ही अशा व्यक्तींना पांढरा, निळा किंवा पिवळा रंगाचं गिफ्ट देऊ शकतात.


वृश्चिक : या राशीच्या लोकांना तुम्ही लाल, जांभळा, चॉकलेटी या ३ रंगाचं गिफ्ट देऊ शकतात.


धनु : या राशीच्या लोकांना पांढऱ्या रंगाचं गिफ्ट देणं तुमच्या संबंधांना आणखी मजबूत करेल. लाल, निळा आणि नारंगी या रंगाचे देखील पर्याय तुमच्याकडे आहेत.


मकर : मकर राशीच्या लोकांना तुम्ही पांढऱ्या रंगाचं गिफ्ट देऊ शकतात. 


कुंभ : कुंभ राशीच्या लोकांना वॉयलेट रंग खूपच आवडतो. या रंगाचं गिफ्ट तुमचा संबंध आणखी मजबूत करु शकतात.


मीन : या राशीचे लोकं खूप इमोशनल असतात. यांना पांढरा, लाल, पिवळा या रंगाचे गिफ्ट देऊ शकतात.