Janmashtmi 2024 : यावर्षी 26 ऑगस्ट 2024 ला श्रीकृष्ण जन्म साजरा केला जाणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार श्रीकृष्णाला मोरपंख आणि बासरी अतिशय प्रिय आहे. मोरपंखाचा वापर जन्माष्टमीच्या पूजेत आवश्य करावा.श्रीकृष्ण नेहमी मस्तकावर मोरपंख धारण करतात.मोरपीसासोबत त्यांच्या जीवनातील अनेक कथा जोडल्या गेल्या आहेत.त्याचप्रमाणे बासरी श्रीकृष्णाच्या ओळखीच प्रतीक मानलं जातं. अशी मान्यता आहे की, श्रीकृष्ण जेव्हा बासरी वाजवत असत तेव्हा सगळेजण मंत्रमुग्ध होऊन त्यांच्याजवळ गोळा होत असतं. श्रीकृष्णांचा आशिर्वाद प्राप्त करण्यासाठी  मोरपंख आणि बासरीचे उपाय अत्यंत फायदेशीर ठरतात. या उपायांमुळे धन आणि सुख - समृद्धी राहते, वैवाहिक जीवन सुखी होत,घरात शांती राहते त्याचप्रमाणे आजारापासून मुक्तता होते.



धन धान्याच्या प्राप्तीसाठी :


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जन्माष्टमीच्या दिवशी बासरी घरी आणून देवघरात ठेवावी. रोज या बासरीची पूजा करावी. असं केल्यास घरात धनधान्याची कधीही कमी भासत नाही.
 


घरात शांती राहण्यासाठी :


घरात शांती राहण्यासाठी जन्माष्टमीच्या दिवशी घरात बासरी आणून एखाद्या पवित्र ठिकाणी ठेवल्यास घरातून नकारात्मक उर्जा बाहेर जाते. यामुळे घरातील मतभेद आणि क्लेश दूर होतात.


हेही वाचा : Janmashtami 2024: भारता शिवाय विदेशातही साजरी होते कृष्ण जन्माष्टमी, हा देशही होतो कृष्ण भक्तीमय...

 


वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी:


जन्माष्टमीच्या दिवशी सुखी वैवाहिक जीवनासाठी पती पत्नींनी झोपण्याच्या खोलीत मोरपंख ठेवावं. यामुळे पतिपत्नीच्या नात्यात गोडवा राहतो.



व्यापारातील समस्या दूर होण्यासाठी :


पत्रिकेत राहूचा अशुभ प्रभाव असेल तर नोकरी व्यवसायात अडचणी उद्भवतात. व्यापारातील या समस्या टाळण्यासाठी घराच्या पूर्व किंवा उत्तर पश्चिम दिशेला मोरपंख लावावं.



आजारापासून मुक्ती मिळण्यासाठी :


घरात कोणी आजारी असेल तर जन्माष्टमीच्या दिवशी मोरपंखाची पूजा करावी. त्यानंतर रोज मोरपंखाची पूजा केल्यास पत्रिकेतील राहूचा प्रभाव कमी होतो आणि आजारपण दूर होत.



 (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)