Janmashtami 2024: भारता शिवाय विदेशातही साजरी होते कृष्ण जन्माष्टमी, हा देशही होतो कृष्ण भक्तीमय...

Krishna Janmashtami 2024: जन्माष्टमीचा सण ऑगस्ट महिन्यात 26 आणि 27 तारखेला साजरा केला जाणार आहे. भारतात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 

Aug 25, 2024, 17:07 PM IST

जन्माष्टमीच्या आधीपासूनच मंदिरात सजावट केली जाते. ज्यांच्या घरी कृष्ण जन्माचा सोहळा असतो त्यांच्या घरीही तयारी सुरू केली जाते. मथुरा, व्दारका, वृंदावन या ठिकाणचा उत्सव तर बघण्यासारखा असतो. पण तुम्हाला माहिती आहे का, कृष्णाची लोकप्रियता फक्त भारतातच नाही तर विदेशातही आहे. चला मग बघूया भारता शिवाय विदेशात कोणत्या ठिकाणी जन्माष्टमी साजरी केली जाते.  

1/8

नेपाळ:

नेपाळ मध्ये हिंदू सणवार खूप उत्साहात साजरे केले जातात. त्यामुळे कृष्ण जन्माष्टमी या सणही तिथे मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतो. नेपाळमधील लोक ऐतिहासिक कृष्ण मंदिरात जाऊन हा सण साजरा करतात. त्यावेळी ते भगवत गीतेचे पठण करतात. आणि अर्ध्या रात्री पर्यंत उपवास ठेवतात. 

2/8

मलेशिया:

मलेशियातील कुआलालम्पुरमध्ये भारतीय लोक नाटक, नृत्या आणि संगिता सोबत कृष्ण जन्माष्टमी साजरी करतात. या दिवशी विदेशातील लोक कृष्ण भक्तीत रमलेले दिसतात. जन्माष्टमी उत्सवानंतर इथे प्रसादही वाटला जातो.

3/8

कॅनडा:

कॅनडामध्ये सर्वात जास्त भारतीय आहेत. म्हणून इथे जन्माष्टमीचा एक वेगळाच रंग बघायला मिळतो. या सणा संबंधीत संगीताचा इथले लोक आस्वाद घेतात. कॅनडातील जन्माष्टमी बघण्यासारखी असते. 

4/8

न्यूजीलॅंड:

ऑकलॅंडमधील श्री श्री राधा गिरीधारी मंदिरात जाऊन तुम्ही फक्त प्राकृतिक नाही तर आध्यात्मिक आनंद घेऊ शकतात. जनमाष्टमीच्या रात्री मंदिराचा परिसर प्रार्थना, भक्ती संगीत आणि दिव्यांनी उजळलेला असतो. एकुणच वातावरण भक्तीमय झालेले असते.

5/8

जर्मनी:

जर्मनीमध्ये अनेक भारतीय लोक राहतात. त्यामुळे तिथेही कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी होते. भारता एवढेच जर्मनीतही जन्माष्टमीचे मोठे महत्त्व आहे.

6/8

इंग्लंड:

इंग्लंडच्या वेगवेगळ्या शहरात जसे की मिल्टन केन्स, मँचेस्टर, ल्युटन, लीसेस्टर, लीड्स आणि यासारख्या अनेक शहरात जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात येते.  

7/8

लंडन:

युनायटेड किंगडम मधील लंडनमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय लोक बघायला मिळतात. त्यामुळे भारताप्रमाणे लंडनमध्ये कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. 

8/8

पोर्तुगाल:

इतर वेगवेगळ्या ठिकाणांप्रमाणे पोर्तुगालमधील लिस्बन आणि यासारख्या शहरांमध्ये जन्माष्टमी साजरी करण्यात येते. उत्सवानंतर इथे सर्वांना प्रसादही दिला जातो.