Thumb Palmistry : प्रत्येक व्यक्तीच्या शरीररचनेनुसार, त्यांच्या स्वभावानुसारही भविष्य लिहिलेलं असं म्हणतात. किंबहुना काही शास्त्रांमध्ये तशी माहितीही नमूद करण्यात आलेली आहे. त्याचाच एक भााग म्हणजे सामुद्रिक शास्त्र (Samudrik shahtra). यामध्ये व्यक्तीच्या शरीरावर असणाऱ्या बऱ्यात गोष्टींच्या माध्यमातून भविष्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. अगदी व्यक्तीच्या हाताचा अंगठाही खूप काही सांगतो असं इथं नोंदवण्यात आलं आहे. तुम्ही कधी यासंदर्भातील निरीक्षण केलंय का? एकदा ही माहिती वाचा आणि पाहा तुमच्या हाताचा अंगठा नेमका कोणत्या प्रकारात मोडतो. (Thumb Palmistry According to samudra shastra read details )


अंगठा लवचीक असल्यास... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की, अनेकांचा अंगठा अतिशय लवचिक असतो. तो अगदी उलटसुलटही वळतो. सामुद्रिक शास्त्रानुसार अशी मंडळी त्यांची शक्ती आणि सामर्थ्य व्यर्थ घालवतात. त्यांचं मन कामात रमत नाही. 


अंगठा वाकलेला असल्यास... 


एखाद्या व्यक्तीचा अंगठा सामान्य झुकलेला अशा व्यक्ती इतरांशी ताळमेळ साधून काम करणाऱ्यांपैकी असतात. परिस्थितीनुसार स्वत:ला रमवणं अशा व्यक्तींना जमतं. 


लांबट आणि बारीक अंगठा...


हस्तरेखा शास्त्रानुसार ज्यांचा अंगठा लांब आणि बारीक आहे अशा व्यक्तांचा स्वभाव समंजस असतो. त्यांची वाणी कोमल असते. या व्यक्तींचा कलाक्षेत्राकडे कल असतो. सोबतच सामाजिक कार्यक्रमांमध्ये ही मंडळी रमतात आणि नावलौकिक मिळवतात. 


लांबट अंगठा असल्यास... 


एखाद्या व्यक्तीचा अंगठा प्रमाणाहून जास्त लांबट असल्यास ही बाब चांगली मानली जात नाही. तर्जनीच्या मध्याहूनही अंगठा उंच असल्यास अशा व्यक्तींना बौद्धिकरित्या अकार्यक्षम समजलं जातं. त्यांच्या वाटेत बरेच अडथळे येतात. 


Horoscope 25 November : या राशीच्या व्यक्तींना नवीन कामामध्ये अडथळे जाणवतील!


 


प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक रचनेनुसार अंगठ्याचीही ठेवण असते. त्यामुळं त्यांचं व्यक्तिमत्त्वं आणि स्वभावही तितकेच विभिन्न असतात. कुतूहलाचा भाग म्हणून ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. 


(वरील माहिती सर्वसामान्य समजुतींच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)