मुंबई : Palmistry म्हणजे हस्तरेखा शास्त्रामध्ये हाताच्या सोबतच बोटं, अंगठा आणि नखांच्या आकारावरून व्यक्तीच्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी दडलेल्या असतात. यांच्याद्वारे अनेक माहिती मिळू शकते जाऊ शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हातांच्या बोटांमध्ये एक अंगठा आहे आणि Palmistry मध्ये त्याचं महत्त्व वेगळं आहे. हाताचा अंगठा संपूर्ण हाताचं प्रतिनिधित्व करत असतो. दरम्यान अंगठ्याची रचना माणसाच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल संपूर्ण माहिती देते. ज्योतिषशास्त्रामध्ये अंगठ्याचे खूप महत्त्व सांगितलं गेलंय.


चला आज जाणून घेऊया अंगठा त्याच्या आयुष्याशी निगडीत कोणती रहस्य सांगतो.


  • Palmistry नुसार, जर एखाद्या व्यक्तीच्या अंगठ्याचा नखाचा भाग लांब असेल तर या व्यक्तींना इतर लोकांवर प्रभाव ठेवायला आवडतं. या व्यक्ती प्रत्येक गोष्टीत स्वतःला सर्वोत्तम सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असतात. 

  • जर नखाचा भाग लहान तसेच रुंद असेल, तर अशी व्यक्ती खूप हट्टी असते. अशा व्यक्तीला कोणतेही काम करण्यास भाग पाडू नये अन्यथा त्यांची खूप चिडचिड होते.

  • जर एखाद्या व्यक्तीचा अंगठा काही प्रमाणात मागच्या बाजूला वाकलेला असेल तर ती व्यक्ती खूप उदार मनाची असते. 

  • एखाद्या व्यक्तीचा दुसरा अंगठा खूप लांब असेल तर अशी व्यक्ती अनेक विषयावर बराच वेळ बोलत राहते. परंतु इतरांवर सहज विश्वास ठेवत नाही. 

  • Palmistry मध्ये नमूद केल्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीचा अंगठा लहान आणि जाड असेल तर अशा व्यक्तीचा स्वभावाने गोंधळलेला असतो. ते काय विचार करत आहेत हे कोणीच समजू शकत नाही. असे लोक त्यांच्या मनासारखे झालं नाही तर चुकीचे पावं उचलू शकतात. 

  • Palmistry मध्ये लिहिल्याप्रमाणे, अंगठ्याची लवचिकता तसंच माणसाचा स्वभाव यांचा एकमेकांशी खूप संबंध आहे. ज्या व्यक्तींचा अंगठा लवचिक असतो आणि पाठच्या बाजूला जास्त मोडतो, अशा व्यक्तीमध्ये कोणाशीही मैत्री करण्याची क्षमता असल्याचं मानलं जातं.