Panchang 28 November 2024 in marathi : आज नोव्हेंबर कार्तिक महिन्यातील गुरु प्रदोष व्रत आहे. प्रदोष व्रत हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा व्रत आहे जो भगवान शिवाला समर्पित आहे. दर महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला हे व्रत पाळले जाते. (Thursday Panchang )  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंचांगानुसार, यावेळी प्रदोष व्रताच्या दिवशी शोभन योगसह सौभाग्य योग असून तो दुपारी 4:01 पर्यंत राहील. या काळात चित्रा नक्षत्राचा संयोगही तयार होईल. ज्योतिष शास्त्रानुसार या शुभ संयोगात भगवान भोलेनाथाची पूजा केल्यास शुभ फळ प्राप्त होते.


तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. गुरुवार हा दिवस भगवान विष्णुला समर्पित आहे. त्यामुळे आज श्री स्वामी समर्थ, गजानन महाराज, साईबाबा यांची उपासना करण्यात येणार आहे. अशा या गुरुवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (Thursday panchang 28 november 2024 panchang in marathi Pradosh Vrat) 


पंचांग खास मराठीत! (28 november 2024 panchang marathi)


वार - गुरुवार 
तिथी - त्रयोदशी - पूर्ण रात्र पर्यंत
नक्षत्र - चित्रा - 07:36:07 पर्यंत
करण - गर - 19:36:59 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - सौभाग्य - 16:00:17 पर्यंत


सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय - 06:54:25
सूर्यास्त - 17:23:54
चंद्र रास - तुळ
चंद्रोदय - 29:00:59
चंद्रास्त - 15:20:00
ऋतु - हेमंत


हिंदू महिना आणि वर्ष


शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 10:29:29
महिना अमंत - कार्तिक
महिना पूर्णिमंत - मार्गशीर्ष


आजचे अशुभ मुहूर्त


दुष्टमुहूर्त - 10:24:14 पासुन 11:06:12 पर्यंत, 14:36:02 पासुन 15:18:00 पर्यंत
कुलिक – 10:24:14 पासुन 11:06:12 पर्यंत
कंटक – 14:36:02 पासुन 15:18:00 पर्यंत
राहु काळ – 13:27:51 पासुन 14:46:32 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 15:59:58 पासुन 16:41:56 पर्यंत
यमघण्ट – 07:36:23 पासुन 08:18:21 पर्यंत
यमगण्ड - 06:54:25 पासुन 08:13:06 पर्यंत
गुलिक काळ – 09:31:47 पासुन 10:50:28 पर्यंत


शुभ मुहूर्त 


अभिजीत - 11:48:10 पासुन 12:30:08 पर्यंत


दिशा शूळ


दक्षिण


ताराबल आणि चंद्रबल


ताराबल 


भरणी, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, रेवती


चंद्रबल  


मेष, वृषभ, सिंह, तुळ, धनु, मकर


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)