Today Panchang: आज सुट्टीचा दिवस म्हणजे रविवार आहे. सगळीकडे सध्या सुट्ट्यांचं वातावरण असलं तरीही काही मंडळी मात्र या सुट्ट्यांची संधी साधून शुभकार्य करण्यालाही प्राधान्य देतात. तुम्हीही आजच्या दिवशी अशाच एखाद्या मुहूर्ताच्या शोधात असाल तर, एकदा पाहा आजचं पंचांग. आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील दशमी तिथी असून रविवार आहे. आजच्या पंचांगमध्ये तुम्ही शुभ काळ ( Today Panchang 18 December 2022) आणि अशुभ काळ जाणून घेऊ शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंचांगमध्ये सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग, ब्रह्म मुहूर्त, अभिजीत मुहूर्त, विजय मुहूर्त, गोधूली मुहूर्त, अमृतकाल, निशिता मुहूर्त या शुभ योगांचा विचार करून सर्व महत्त्वाचे कार्य करण्यासाठी वेळ निश्चित करू शकता. भारतीय वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मुहूर्त शुभ मुहूर्तांतर्गत येतात. सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योग, पुष्कर योग हे विशेष शुभ योग मानले जातात.


तसेच राहुकाल, आदल योग, विदल योग, गुलिक काल, वर्ज्य, यमगंड, दुर्मुहूर्त आणि भद्रा इत्यादी अशुभ योग मानले जातात, ते टाळण्यासाठी वेळेचे भान ठेवून आपली महत्त्वाची कामे निश्चित करावीत. भाद्रा विशेषत: अशुभ मानली जाते.  (todays panchang 18 December 2022 shubh mahurat )


आजचा वार - रविवार


पक्ष : कृष्ण पक्षतिथी- एकादशी


नक्षत्र -  चित्रा


आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय : सकाळी 07:08 वाजता
सूर्यास्त : संध्याकाळी 05:27 वाजता
चंद्रोदय : दुपारी 02:31 वाजता, 19 डिसेंबर
चंद्रास्त : दुपारी 01:35 वाजता


चंद्र रास-  पौष – पूर्णिमान्त  


आजचे अशुभ मुहूर्त


राहुकाल –  दुपारी 4.10 ते संध्याकाळी 5.27 वाजेपर्यंत 
यमगण्ड–  दुपारी 12.18 ते दुपारी 1.35 वाजेपर्यंत 
गुलिक काळ - दुपारी 2.52 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत 
दुर्मुहूर्त - दुपारी 4.05 ते  दुपारी 4.46 
वर्ज्य - दुपारी 2.02 ते दुपारी 3. 48 वाजेपर्यंत
आडल योग - सकाळी 7.08 ते 10.18 वाजेपर्यंत
विडाल योग -  दुपारी 2.02 ते दुपारी 3.48 वाजेपर्यंत 


शुभ काळ 


अभिजीत मुहूर्त - सकाळी 11.57 ते दुपारी 12:38 पर्यंत
विजय मुहूर्त  - दुपारी 04:03 ते दुपारी 05:43 पर्यंत
निशिता मुहूर्त - रात्री 11.51 ते मध्यरात्री 12.45, 149 डिसेंबर 


 


(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)