मेष - मित्रपरिवार आणि भावंडांकडून सहयोग मिळेल आणि नवीन काम सुरू कराल. विचार केलेली सर्व काम आज पूर्ण होतील. संपत्तीच्या कामकाजावर लक्ष द्या. आजचा दिवस खासगी कामात आणि पैशांशी संबंधीत कामात जाईल. जोडीदारासोबत आजचा दिवस घालवाल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ - नकारात्मक विचारांमध्ये अडकलात तर महत्वाची संधी हातातून जाईल. आज कोणताही महत्वाचा निर्णय घेण्यापूर्वी शांत डोक्याने विचार करा. दिवसभर थोडी चिडचिड होईल. शांत राहणंच योग्य ठरेल. जोडीदारासोबत गाडी चालवताना काळजी घ्या. आरोग्य ठिक असेल पण आत उत्तम जेवण मिळाल्यामुळे मन प्रसन्न राहिल. 


मिथुन - नवीन काम आणि नवीन बिझनेस डिल समोर येतील. संकटांना सामोरं जाण्यासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. नवीन ऑफर मिळतील, ठरवलेली सगळी काम पूर्ण होतील. 


कर्क - प्रिय व्यक्तीसोबत गैरसमज होत असतील. नोकरी आणि व्यवसायात कोणतीही घाई करू नका. सगळ्याच गोष्टींसाठी मेहनत जास्त घ्यावी लागेल. कर्क राशीच्या लोकांनी आज आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. 


सिंह - ठरवलेलं कोणतंच काम आज पूर्ण होणार नाही. अनेक विचारांमध्ये अडकाल त्यामुळे खूप थकवा जाणवेल. मनात अनेक गोष्टी घडत असल्यामुळे त्रास होईल. आझ कोणताच प्लान करू नका. दिवस नकारात्मक आहे. 


कन्या - व्यवसायात नवीन योजना सुरू कराल. या कामात जोडीदाराची साथ लाभेल. प्रिय व्यक्तीसोबत आज दिवस घालवाल. ठरवलेली सर्व काम आज पूर्ण होतील. आजच्या दिवशी महत्वाच्या लोकांशी गाठीभेटी होतील. मन प्रसन्न राहेल. 


तूळ  - आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असेल. परिस्थितींचा फायदा घेऊन आज सर्व काम पूर्ण करा. कामातच आजचा दिवस जाणार असून ठरवलेली सगळी काम पूर्ण होतील. जोडीदाराकडून सरप्राईज मिळण्याची संधी मिळेल. 


वृश्चिक - नोकरी आणि व्यवसायात अचानक निर्णय घ्यावे लागतील. गोंधळ वाढू शकतो. अचानक संकट येऊ शकतं त्यासाठी सज्ज राहा. कामात त्रास आणि असुविधा होऊ शकते. 


धनू - आर्थिक प्रश्न आज सुटतील. वैवाहिक जीवन आजपासून सुखाचा असेल. पण अनेक ठिकाणी तडजोड करावी लागेल. रूटीन कामातून धनलाभ होईल. कर्ज घेण्यासाठी आज मनाची तयारी कराल. 


मकर - आजच्या दिवशी सावधान राहा. काही लोकं आपल्या स्वार्थासाठी त्रास देतील. मानसिक त्रास होईल. मन कणखर ठेवा. काही महत्वाची काम आज अर्धवट राहतील. कामात मन लागणार नाही. 


कुंभ - ऑफिसमध्ये स्वतःवर नियंत्रण ठेवा. ठरवलेल्या सर्व योजना आज पूर्ण होतील. नवीन कामांसाठी सज्ज राहा. जोडीदारासोबत दिवस घालवाल. 


मीन - व्यवसायात काही नवीन करण्याच्या विचारात त्रास वाढेल. मनात सुरू असलेल्या गोंधळामुळे कामात लक्ष लागणार नाही. नोकरीमध्ये कोणतीही घाई करू नका.