मुंबई : पाहा आजचा दिवस तुमच्यासाठी कोणती नवी दारं खुली करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष - आज कामाचा व्याप वाढेल. कोणतीही अडचण असल्यास मित्रांशी मोकळेपणानं बोला. तोडगा निघेल. अडकलेले पैसे परत मिळणार आहेत. 


वृषभ- आज एखादी शुभवार्ता तुम्हाला कळणार आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष द्या. आज तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. 


मिथुन- एखाद्या व्यक्तीचा मानसिक आधार तुम्हाला मोठा दिलासा देणार आहे. नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील. गायीची सेवा करा. 


कर्क- एखादं नवं उपकरण खरेदी कराल. आरोग्याची काळजी घ्या. शेअर बाजारात गुंतवणूक असल्यास फायदा होणार आहे. 


सिंह - आरोग्याची काळजी घ्या. अडकलेले पैसे आणि व्यवहार मार्गी लागतील. नवी खरेदी कराल. अवाजवी खर्च करु नका. 


कन्या- पोटाचा त्रास सतावेल. जोडीदाराला कोणत्याही मुद्द्यावरून सतावू नका. वाद मिटवण्याचा प्रयत्न करा. 


तुळ- मोठ्या समस्याही शांत मनानं निकाली काढा. परिणाम पाहा. आज तुम्हाला एखादी आनंदाची बातमी करणार आहे. 


वृश्चिक- विवाहोत्सुकांसाठी आज एखादं स्थळ येणार आहे. मित्रांना मदत करा, तुमच्या पडत्या काळात त्यांचा आधार होता हे विसरु नका. कुटुंबीयांना वेळ द्या. 


धनु- आज एखाद्या धार्मिक कार्याच्या निमित्तानं प्रवासयोग संभवतो. मनात असणाऱ्या इच्छा आज पूर्ण होणार आहेत. संतापापासून दूर राहा. 


मकर- आज चांगल्या पगाराची नोकरी तुम्हाला मिळणार आहे. चांगली संधी पाहून उडी मारा. समाजात मिळणारा आदर वाढेल. 


कुंभ- नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत मिळणार आहे. आज मन प्रसन्न असेल. कौटुंबीक कार्यक्रमात सहभागी व्हाल. 


मीन- आज चांगले निकाल हाती येणार आहेत. मेहनतीचं फळ आज तुम्हाला मिळणार आहे. जवळची व्यक्ती एखादी आनंदाची बातमी देईल.