आजचे राशीभविष्य | रविवार | १५ सप्टेंबर २०१९
जाणून घ्या कसा आहे, तुमचा आजचा दिवस
मेष- भावनांमध्ये चढउतार येतील. दैनंदिन जीवनातकाही महत्त्वाचे बदल होतील. कोणत्या एका गोष्टीविषयी चिंता करु नका. सोबत काम करण्यांचं सहकार्य़ लाभेल. चांगले बेत आखाल. येत्या दिवसांमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे.
वृषभ- आज स्वत:चं महत्त्वं कळेल. दैनंदिन कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. जदबाबदारी पार पाडाल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. राजकीय क्षेत्रात एखादं मोठं पद मिळेल.
मिथुन- अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. अपूर्ण कामं पूर्ण होतील. आज घेतलेले निर्णय चांगल्या रितीने परिणामकारक ठरतील. ज्या व्यक्तींशी फायदा होणार आहे, त्यांना भेटण्याची संधी मिळेल. व्यवसायाच्या निमित्ताने प्रवासयोग आहेत.
कर्क- आर्थिक कामं अडणार नाहीत. अचानक धनलाभ होण्याची शक्यता. इतरांच्या मनात नेमकं काय सुरु आहे, ते तुम्हाला कळेल. व्यापारात यश मिळण्याचे योग आहेत. खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न कराल. अडकलेली कामं पूर्ण कराल.
सिंह- एखादं वाहन खरेदी करण्याची इच्छा होईल. आज तुम्ही जास्त संवेदनशील असाल. जास्त वेळ जाईल. साथीदाराची साथ लाभेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे.
कन्या- एखाद्या व्यक्तीसोबतचे संबंध सुधारतील. आत्मविश्वास वाढेल. कोणा एका कामाचा आग्रह करु नका. कामाच्या पद्धती सुधारतील. इतरांप्रती तुमचा स्वभाव हा मित्रत्वाचा असेल. गुंतवणुकीचा फायदा असेल.
तुळ- कमी वेळात जास्तीत जास्त कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी यश मिळण्याचा योग आहे. व्यवसाय आणि नोकरीमध्ये यश मिळेल. देवाणघेवाणीच्या बाबतीत नशीबाची साथ मिळेल.
वृश्चिक- एखादं काम स्वत: कराल. दिवस सामान्य आहे. कामाचा व्याप वाढेल. शुभकार्यांमध्ये सहभागी व्हाल. नव्या मित्रांची भेट घेण्याची संधी मिळेल.
धनु- हाताशी जास्त वेळ ठेवा. आज कामात गुंतलेले असाल. स्पष्टपणे तुमचं म्हणणं पुढे ठेवा. आज कोणत्याही विषयांवर विश्वास ठेवू शकता. परिस्थिती तुमच्या पक्षात आहे.
मकर- एखाद्या खास कामात कुटुंबाची मदत मिळेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. नशीबाची साथ मिळेल. आटोपलेली कामं फायद्याची ठरतील. इतरांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न कराल.
कुंभ- आज तुमच्या कोणत्याही कामात इतरांची मदत होणार आहे. न्यायालयीन कामं पूर्ण होतील. अडकलेली कामं पूर्ण होतील. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाने इतर प्रभावित होतील.
मीन- कामाच्या निमित्ताने आदर मिळेल. साथीदाराचं सहकार्य मिळेल. खर्च आणि गुंतवणूकीचा निर्णय़ स्वत:च घ्या. दैनंदिन कामं पूर्ण होतील. इतरांचं सहकार्य मिळेल.