मेष - कामाचा व्याप वाढेल. दिवसरभर व्यग्र असाल. व्यापारात काही गोष्टी अडचणी निर्माण करु शकतील. समजुतदारपणे काम करा. कामाच्या ठिकाणी थोडी शांतता राखा. अडचणींचा सामना करण्याचे बेत आखाल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


वृषभ- जुन्या अडचणी दूर होतील. स्वत:ची काळजी घ्या. नव्या कपड्यांची खरेदी करा.ल. अनेक कल्पना सुचतील. यशस्वी होण्यासाठी धोडा धीर बाळगा. 


 


मिथुन- धन लाभ होण्याची शक्यता आहे. अशा कामांपासून मिळणारा फायदा दीर्घकाळ टीकेल. काही रंजक योजना आखाल. बुद्धीचातुर्य़ाने कामं पूर्ण कराल. एखादी शुभवार्ता कळेल. एखाद्या व्यक्तीसोबत मतभेद होतील. 


 


कर्क- अचानक धनलाभ होऊ शकतो. अडकलेले पैसे परत मिळतील. एखाद्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मित्रांची मदत होईल. कोणा एका व्यक्तीशी मतभेद झाले, तर त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. 


 


सिंह- आर्थिक परिस्थितीत काही महत्त्वाचे बदल घडतील. ज्यामुळे तुम्ही आनंदीत असाल. महत्त्वाकांक्षी असाल. तुमच्या अपेक्षांवर ताबा ठेवा. कामाच्या निमित्ताने एखादा प्रवासयोग आहे. कामाच्या ठिकाणी असणारी तणावग्रस्त परिस्थिती संपुष्टात येईल. 


 


कन्या- नोकरीच्या ठिकाणी एखादी नवी सुरुवात करण्याची हीच योग्य वेळ आहे. आजचा दिवस तसा बेताचाच आहे. साथीदारासोबत जास्त वेळ व्यतीत कराल. जमिनीच्या व्यवहारांची कामं पूर्ण कराल. 


 


तुळ- विचाराधीन कामं पूर्ण कराल. याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. आज तुम्ही तुलनेने जास्त चांगलं काहीतरी अनुभवाल. मित्रांसमवेत वेळ व्यतीत कराल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. 


 


वृश्चिक- तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. अशा काही गोष्टी समोर येतील ज्यांचा तुम्हाला येत्या काळात फायदा होईल. एखाद्या अडचणीवर तोडगा काढाल. नशीबाची साथ असेल. अडकलेले पैसेही मिळतील.


 


धनु- नोकरी आणि करिअरच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे. नव्या नोकरी किंवा बढतीच्या प्रयत्नांत असाल तर, तुमचे प्रयत्न पूर्णपणे यशस्वी ठरतील. तुमच्या मदतीसाठी अनेकजण तयार असतील. 


 


मकर- एखादं महत्त्वपूर्ण काम कराल. ज्याचा तुम्हाला अधिक फायदा होऊ शकतो. पूर्ण मेहनत करण्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. नव्या कामाची सुरुवात करण्यापूर्वी जुनं काम पूर्ण करा. 


 


कुंभ- धैर्याने परिस्थितीचा सामना करा. दिवसभर पैशांच्याच बाबतीत विचार कराल. जमीनीच्या व्यवहारांचा योग आहे. दैनंदिन कामं जरा जास्त असतील. पुढे जाण्यासाठी काहीतरी नवं शिका. आरोग्याची काळजी मिटेल. 


 


मीन- आज जी काही कामं कराल त्यांचा फायदाच होणार आहे. या कामातून अर्थार्जनाचीही संधी आहे. कागदोपत्री व्यवहारांवर लक्ष द्या. फिरायला बाहेर जाण्याची इच्छा होईल. महत्त्वाची कामं पूर्ण होतील.