मेष- कामाच्या विषयी गांभीर्याने विचार करा. इतरांच्या सल्ल्यांवर लक्ष द्या. नवीन लोकांशी भेट घेऊन फायदा होऊ शकतो. करिअर, व्यवसाय, नोकरी या महत्त्वपूर्ण कामांच्या अनुषंगाने प्रवासदौरे होण्याची शक्यता आहे. लग्नाविषयीच्या चर्चा होतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- अचानक फायदा होऊ शकतो. धनलाभ होण्याची शक्यता. काही अशा व्यक्तींशी भेट घडेल जे तुमच्यावर प्रभाव पाडण्यात यशस्वी ठरतील. दैनंदिन कामं पूर्ण होतील. 


मिथुन- उत्साह शिगेला असेल. नव्या व्य्क्तींशी भेट होईल. नात्यांशी जोडले गेलेले अनेक पैलू तुमच्यासाठी खास असतील. नात्यांच्या बाबतील काही सल्ले अपेक्षित असतील तर, यासाठी वेळ चांगला आहे. अनपेक्षित कामं आणि जबाबदाऱ्यांसाठी तयार असाल. 


कर्क- मुलाबाळांकडून मदत मिळेल. नशीबाच्या साथीने व्यापारात प्रगती कराल. पैशांच्या बाबतीत सुखवार्ता कळेल. सकारात्मक दृष्टीकोन असेल.विचारात असणारी बरीच कामं पूर्णत्वास जातील. 

सिंह- जीवनात काही महत्त्वाचे बदल होतील. नव्या भेटीगाठी होतील. स्वत:ची वेगळी ओळख प्रस्थापितक करण्यात यशस्वी व्हाल. प्रेम करणाऱ्या व्यक्तीसोबत्या नात्यामध्ये चांगल्या सुधारणा होण्याची चिन्हं आहेत. भागीदारीच्या व्यवहारांमध्ये फायदे होण्याची शक्यता आहे. 


कन्या- इतरांप्रतीची वागणूक सहानुभूतीपूर्व असेल. कोणा एका मित्राच्या सल्ल्याचा फायदा होईल. एखादा असा निर्णय घ्याल ज्याचा इतरांवर परिणाम होईल. 

तुळ- काही कारणाने आज फार उत्साही असाल. चांगल्या वाणीमुळे फायदा होईल. सकारात्मक दृष्टीकोन असेल. दिवस मात्र सामान्य असेल. कुटुंबात नवा सदस्य येण्याची चिन्हं आहेत. स्वत:वर विश्वास ठेवलात तर प्रकृती उत्तम राहील. 


वृश्चिक- दिवस आनंददायी असेल. स्वत:मध्ये बदल करण्याचा प्रयत्न कराल. काही विचार मनात असतील तर आजचा दिवस खास आहे. अर्थार्जनाची नवी संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी नम्रपणे वागा. नातेवाईकांशी भेट होण्याची शक्यता आहे. 


धनु- थोडे व्यहाराच्या दृष्टीने जास्त विचार कराल. ज्याचा तुम्हाला फादचा होणार आहे. भावनिक दृष्ट्या उत्साही असाल. स्वत:वर आणि इतरांवर फार विश्वास असेल. नवे प्रेमसंबंध सुरु होण्याची चिन्हं आहेत. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. 

मकर- बऱ्याच बाबतीत आज व्यग्र असाल. कामातून काढता पाय घेऊ नका. अर्थार्जनाच्या काही नव्या आणि चांगल्या संधी मिळतील. स्वत:ची वेगळी ओळख प्रस्थापित करण्यात यशस्वी व्हाल. पगारवाढ संभाव्य आहे. व्यापाराशी संबंधित काही बेत आखाल. जे पुढे जाऊन तुमच्यासाठी फायद्याचे ठरतील. 


कुंभ- देणंघेणं आणि बचतीच्या बाबतीत आज तुम्हाला गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.  दिवस चांगला असेल. भविष्यातील योजनांवर विचार कराल. साथीदाराशी असणारे मतभेत संपवण्याच्या प्रयत्नांना यश मिळेल. साथीदाराच्या भावनाही समजून घेण्याचा प्रयत्न कराल. आई- वडिलांची मदत मिळेल. 


मीन- नशीबाची साथ मिळेल. काहीतरी नवं करण्यासाठी प्रेरित व्हाल. कामाच्या ठिकणी वाढीव जबाबदारी दिली जाईल. पगारवाढ होण्याची शक्यता आहे.  


- दीपक शुक्ला