आजचे राशीभविष्य | शनिवार | 18 मे 2019
असा असेल तुमचा आजचा दिवस
मेष : मित्र आणि भावांकडून सहकार्य मिळेल. ठरवलेली कामे पू्र्ण होतील. दिवस चांगला आहे. चांगली बातमी मिळू शकते. तुमच्यासाठी काही गोष्टी सहज सुटू शकतात. समस्यांचे काही रचनात्मक समाधान काढण्याचा प्रयत्न कराल आणि त्यामध्ये यश मिळेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. केलेल्या चांगल्या कामांचे कौतूक होईल. या कामांचा फायदा तुम्हाला काही दिवसांनी नक्की मिळेल.
वृषभ : नकारात्मक भावनेत असाल तर महत्त्वाच्या संधीला मुकाल. काही अशा लोकांच्या भेटी होतील ज्यांच्याकडे पैसे कमावण्याचे चांगले विचार किंवा संधी असतील. लोकांच्या मदतीने तुमची कमाई वाढू शकते. कामाची गती हळूहळू परत येईल. करियरमध्येही हळूहळू गती पकडाल. व्यावहारिक योजना बनवाल आणि त्यावर काम देखील कराल. यातून चांगले यश मिळेल. जोडीदारांशी चांगले संबंध होतील. मानसिक सहकार्याची गरज आहे जे तुम्हाला जोडीदाराकडून मिळेल.
मिथून : व्यवसायात नव्या संधी येण्याचा योग आहे. तुमच्या ओळखी मजबूत करण्याची वेळ आहे. आज शांत राहा. आपले आरोग्य आणि मनाकडे लक्ष द्या. जेवढे शक्य होईल तितके व्यावहारिक राहण्याचा प्रयत्न करा. खास कामे थोडी थांबून केलात तर चांगले असेल. तुमचा व्यवहार पद्धतशीर ठेवण्याचा प्रयत्न करा. याचा तुम्हाला फायदा होईल.
कर्क : प्रेम आयुष्यात गैरसमज होऊ शकतात. काही प्रकरणांमध्ये शांत राहाल आणि नव्या पद्धतीने विचार कराल तर पैसे कमावण्याचे नवे मार्ग डोक्यात येतील. नोकरी आणि व्यवसायातील प्रश्न सुटतील. भागीदारीतून कामे पूर्ण कराल. पगारवाढ आणि पदोन्नती होण्याची शक्यता आहे. नव्या योजनांची ऑफर मिळेल.
सिंह : महत्त्वपूर्ण आणि जवळची नाती मजबूत होतील. नात्यामध्ये काही महत्त्वाचे बदल होतील. जास्तीत जास्त समस्यांचे समाधान होईल. तुमचे प्रयत्न सार्थकी लागतील. जोडीदार आणि जवळच्या मित्रांशी आवडीच्या गप्पा रंगतील. जवळच्या धार्मिक आणि राजनितिक घटनांचा तुम्हाला फायदा होईल.
कन्या : व्यवसायात नव्या योजनांवर काम कराल. कोणत्यातरी नव्या कामाची सुरूवात होऊ शकेल. जुनी अडलेली कामे पुन्हा सुरू होतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला जास्त जबाबदारी मिळेल. जास्त मेहनत केल्याचा फायदा होईल. दुसऱ्यांची मदत कराल. त्यासाठी जास्त मेहनतही घ्यावी लागेल. जुने व्यवहार एकदा तपासून पाहा, त्यातून फायदा होऊ शकतो. घर आणि शहरातून बाहेर जाण्याचा विचार कराल.
तूळ : नव्या आव्हानांना सामोरे जाण्याची संधी तुम्हाला मिळेल. कार्यालयात कनिष्ठांकडून सहकार्य मिळेल. दिवसभर सकारात्मक राहा. हळूहळू सर्वकाही ठिक होईल. नव्या लोकांशी ओळख होऊन चांगल्या संधी मिळतील. रोमांससाठी वेळ काढाल. रचनात्मक कामांमध्ये यश मिळेल. संयम ठेवून काम कराल तर जास्त काम संपवू शकाल.
वृश्चिक : तुमची जबाबदारी वाढू शकते. धार्मिक आणि सामाजिक कामांसाठी वेळ काढाल. परिवारासोबत वेळ घालवाल. नवी सुरूवात करण्याचा प्रयत्न होईल. पगार वाढण्याचा योग आहे. नशिबाची साथ मिळेल. कोणती तरी चांगली बातमी मिळेल. विद्यार्थी आनंदी असतील. मेहनत खूप करावी लागेल. मित्र आणि भावांचे सहकार्य मिळेल.
धनू : दुकान किंवा प्लॉट संदर्भात काम पूर्ण होण्याचे योग आहेत. नव्या लोकांशी ओळख होईल. महत्त्वपूर्ण आणि नवी सुरूवात होण्याची संधी आहे. काही लोकांच्या भल्यासाठी तुम्ही काम कराल. तुमच्या कामात राहा आणि त्यावरच लक्ष केंद्रीत करा. जोडीदारासोबत काही रोमांसचे क्षण घालवाल. काही दिवसांपासून तुम्ही जे प्लानिंग करत आहात त्यावर काम करायला सुरूवात देखील कराल.
मकर : काही रोचक आणि नव्या संधी तुम्हाला मिळू शकतील. तुमच्याच राशीत चंद्र आहे. नवी सुरूवात करावी लागेल. आत्मविश्वासाने काम कराल. नकारात्मक विचारांवर लक्ष देऊ नका. जास्तीत जास्त अडचणी वेळीच संपून जातील. तुम्ही काळजी करु नका. तुम्हाला विवाहाचे प्रस्ताव येतील. व्यवसायात काही बदल करण्याचे मन बनू शकेल. राजकीय क्षेत्रातही वेळ चांगला जाईल.
कुंभ : तुमचे लक्ष मुले आणि शिक्षणाकडे जास्त असेल. आज तुमचा सकारात्मक दृष्टीकोन राहीला तर दिवस चांगला जाईल. येणाऱ्या दिवसांमध्ये नव्या संधी मिळतील. योजना बनवा आणि योग्य वेळेची वाट पाहा. आजुबाजूचा किंवा कोणताही व्यक्ती तुमच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू शकतो. आज खर्च देखील जास्त होईल. जोडीदारासोबत बाचाबाची होऊ शकते.
मीन : प्रेमी किंवा परिवारातील मंडळींसोबत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न कराल. ज्या लोकांना तुमची गरज त्यांच्याशी ओळख होईल. दुसऱ्यांची मदत कराल. कोणत्या तरी गोष्टीने किंवा स्थितीने तुमचा विचार बदलेल. हा बदल आज देखील महत्त्वाचा आणि तुमच्यासाठी सकारात्मक राहील. पैशांचा फायदा आणि कामाच्या ठिकाणी मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे.