आजचे राशीभविष्य | मंगळवार | १९ फेब्रुवारी २०१९
असा असेल तुमचा आजचा दिवस
मेष- काही कामांमध्ये अडचणी येतील. मेहनत घ्यावी लागेल. नोकरी बदलण्याचा विचार कराल. विचारपूर्वक निर्णय घ्या. आरोग्याची काळजी घ्या. घाईने घेतलेला निर्णय महागात पडू शकतो. पैसे आणि गुंतवणूकीच्या बाबतीत काही महत्त्वाच्या व्यक्तीचा सल्ला घ्या.
वृषभ- व्यवसायात प्रगती होणार. नोकरीच्या ठिकाणी बढती मिळेल. एकत्र काम करणाऱ्यांना फायदा होणार. अविवाहितांच्या आयुष्यात प्रेमाचा बहर येईल. साथीदाराती मदत होईल. कामाचा व्याप वाढेल. करिअरमध्ये पुढे जाण्याच्या संधी मिळतील.
मिथुन- ग्रहांची स्थिती चांगली आहे. आज बऱ्यापैकी सक्रिय असाल. नोकरीच्या ठिकाणी नवी जबाबदारी मिळेल. अडलेली कामं पुढे न्याल. नव्या लोकांशी जोडले जाल. भावनात्मक आधार मिळेल. आरोग्य सुधारेल.
कर्क- नोकरीच्या ठिकाणी काही व्यक्तींवर प्रभाव पाडू शकाल. काम बदलण्याचाही विचार कराल. नशीबाची साथ मिळेल. नवी सुरुवात कराल. अडकलेले पैसे परत मिळतील. अपघातामुळे दुखापत होण्याची शक्यता. काळजी घ्या.
सिंह- वरिष्ठांची मदत मिळू शकेल. व्यवसायात सावधगिरी बाळगा. त्यात यश मिळेल. व्यवसायात अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. घाई करु नका. एकटेपणापासून दूर राहा. अपूर्ण कामं पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करा. नवे बेत आखाल.
कन्या- नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीच महत्त्वाचे निर्णय घ्याल. आर्थिक स्थिती सुधारेल. महत्त्वाच्या व्यक्तींची भेट घडेल. पदोन्नती होईल. आरोग्यात सुधारणा होईल.
तुळ- अडकलेली कामं पूर्ण होतील. नोकरी आणि व्यवसायामध्ये वेळीच सहकार्य न मिळाल्यामुळे अडचणी येतील. काही व्यक्ती तुमच्या कामाचा विरोध करतील. साथीदाराची मदत मिळेल.
वृश्चिक- नोकरीच्या ठिकाणी दिवस बेताचा असेल. शत्रूवर विजय मिळण्याची शक्यता. मोठी जबाबदारी मिळेल. चांगल्या संधी मिळतील. व्यापाराच्या बाबतीत काही निर्णय घ्याल. फिरण्यासाठी जाण्याचे बेत आखाल. आरोग्याची काळजी घ्या.
धनु- नोकररदार वर्गाला अडचणींचा सामना करावा लागेल. व्यापारी वर्गाने काळजी घ्यावी. वायफळ कामांमध्ये वेळ वाया जाईल. कामाच्या निमित्ताने बाहेर जाल. प्रेमाच्या बाबतीत आयुष्यात काही बदल होतील.
मकर- जुने वाद निर्णयात निघतील. परिस्थिती अनुकूल आहे. अडकलेली कामं पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करा. उत्साह वाढलेला असेल. कोणावरही विश्वास ठेवू नका. साथीदाराशी मतभेद होऊ शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
कुंभ - करिअरच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. कामाच्या ठिकाणी इतरांची मदत मिळेल. काही चांगले आणि मोठे बदल होणार. नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. धनलाभ होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या.
मीन- अचानक कोणाच एका गोष्टीचा फायदा होऊ शकतो. नको त्या गोष्टींवर जास्त खर्च कराल. नव्या जबाबदाऱ्या मिळतील. आरोग्याची काळजी घ्या.