मेष- कोणतंही विधान अगदी विचारपूर्वकपणेच करा. इतरांकडून काहीही अपेक्षा ठेवू नका. स्वत:च्या वतीने इतरांशी विनम्रतेने वागा. आज होणारी एखादी खास चर्चा भविष्यात तुमच्यावर प्रभाव पाडणारी ठरू शकते. मनावर विश्वास ठेवा. मोठ्या मंडळींसोबत राहाल. ज्याचा येत्या काळात फायदा होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- शांत राहा आणि येत्या काळासाठीचे बेत आखा. मन लावून काम करा. योग्य वेळ येताच त्याचा फायदा होईल. आखलेल्या योजना पूर्णत्वास जातील. शुभवार्ता कळेल. व्यवसायाच्या निमित्ताने प्रवासयोग आहेत. बरीच कामं पूर्ण होतील. 


मिथुन- जबाबदारीपेक्षा जास्त कामाचा भार घेऊ नका. स्वत:वर नियंत्रण ठेवा. भावनात्मक प्रसंगांमध्ये स्वत:ला आवरा. पैशांच्या बाबतीत घाईने पुढे जाण्याची गरज नाही. मोठ्यांचे सल्ले फायद्याचे ठरतील. कला, संगीत, भाषा, लेखन या क्षेत्रात करिअर करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. व्यावसायिकांनी काळजी घ्या. 


कर्क- अचानक फायदा होण्याची चिन्हं. अडकलेले पैसे मिळतील. कोणत्याही अडथळ्याविना अडकलेली कामं पूर्ण होतील. एखाद्या मोठ्या गोष्टीविषयी असणारा तणाव दूर होईल. खूप उत्साह असेल. मित्र आणि आप्तेष्टांविषयी विचार कराल. सकारात्मक राहाल. कोणत्याची तणावपूर्ण परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी शांततेने विचार करा. 


सिंह- नियोजित पद्धतीने काम करा. लवकर यशस्वी व्हाल. आयुष्यात काही महत्त्वाचे बदल होतील. या बदलांची चाहूल तुम्हाला आधील लागलेली असू शकते. मित्रांची मदत मिळेल. 


कन्या- जवळपास सर्व अडचणी दूर जातील. कामं वेळच्या वेळी पूर्ण करा. काही गोष्टीमध्ये अपयशी ठरलात तरी प्रयत्न करणं सोडू नका. धैर्याने काम करा, यश मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे मिळतील. 


तुळ- गोड बोलून इतरांकडून कामं करुन घ्याल. करिअर आणि खासगी आयुष्याला प्राधान्य द्याल. नव्या नोकरीसाठी प्रयत्न कराल. काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. मोठ्यांचा आशीर्वाद मिळेल. 


वृश्चिक- एखाद्या महत्त्वाच्या निर्णयावर पोहोचाल. मनात गेल्या काही दिवसांपासून ज्या मुद्द्यावर घालमेल सुरु आहे ती अखेर संपुष्टात येईल. दिवस बेताचाच आहे. आर्थिक कामात प्रगती मिळेल. 


धनु- पुढे जाण्याच्या काही चांगल्या संधी मिळतील. जास्तीत जास्त शांत राहण्याचा प्रयत्न करा. तडजोड करावी लागू शकते. कुटुंबासोबत चांगला वेळ व्यतीत कराल. नवी वस्तू किंवा वाहन खरेदी करण्याता विचार करु शकाल. स्वत:च्या गोष्टींची काळजी घ्या. 


मकर- अजाणतेपणाने असं एखादं काम कराल ज्यामुळे तुमची प्रतिमा उंचावेल. जास्त मेहनत घेतली नाही तरीही फायदाच होईल. भावंड आणि मित्रांची मदत होईल. दिवसभर व्यवसायाविषयी काही महत्त्वाचे बेत आखाल. अडचणींवर तोडगा निघण्याची चिन्हं. 


कुंभ- अर्थार्जनाच्या संधी मिळतील. एकाग्रता ठेवा. सोबत असणाऱ्या काही व्यक्तींशी खास गोष्टींवर चर्चा होईल.  प्रेमाच्या नात्यांमध्ये आणखी सुधार येईल. व्यवसायात अडचणी दूर होतील. नवीन व्यक्तींशी भेटीगाठी होतील. ओळख वाढेल. धैर्याने काम कराल. 


मीन- गरजेपेक्षाही जास्त काम करण्याचा उत्साह असेल. ज्याच्या बळावर योग्य मार्गाचा अवलंब कराल. यश हे तुमच्या नियोजनावरच आधारलेलं आहे. ऐनवेळी कोणत्याही निर्णयावर पोहोचण्यापूर्वी विचार करा.