Surya Gochar 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या ठराविक वेळेनंतर स्थान बदलतो. ग्रहांचा राजा सूर्य देव दर एक महिन्याने एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतो. सूर्यदेव हा प्राणशक्ती, ऊर्जा आणि जीवनाचा कारक मानला जातो. सूर्यदेव हा सकारात्मकतेचं प्रतीक आहे. सूर्याच्या गोचरला संक्रांती म्हटलं जातं. सूर्याने धनु राशीत गोचर केल्यामुळे याला धनु संक्रांती असं म्हटलं जातं. सूर्याच्या या गोचरमुळे राशींवर याचा परिणाम दिसून येतो. काहीसाठी हा शुभ ठरणार आहे. तर काही राशींसाठी पुढील एक महिना संकटांचा असणार आहे. सूर्यदेव धनु राशीत 15 जानेवारी 2024 विराजमान असणार आहे. त्यानंतर नवीन वर्षात तो मकर राशीत प्रवेश करेल. (Transit of Sun in Sagittarius Next month of troubles for these zodiac signs people Surya Gochar 2023 )


पुढील एक महिना 'या' राशींसाठी कष्टांचा!


वृषभ रास (Taurus Zodiac) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राशीच्या लोकांसाठी सूर्याचं संक्रमण अशुभ ठरणार आहे. सूर्याच्या राशीतील या बदलामुळे तुमचा आत्मविश्वास खूप जास्त कमी होणार आहे. या राशीच्या लोकांचं आरोग्यही बिघडण्याची शक्यता आहे. तुमचं शारीरिक, मानसिक आणि भावनिक नुकसान होणार आहे. या राशीच्या लोकांना त्यांच्या आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागणार आहे. सूर्याच्या भ्रमणामुळे तुमच्या कौटुंबिक जीवनात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवणार आहे. या संक्रमणादरम्यान, तुमचं तुमच्या वडिलांसोबतचं नातं बिघडण्याची शक्यता आहे. लोकांशी तुमचे मतभेद होणार आहे. 


मिथुन रास (Gemini Zodiac)


 


या राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनासाठी सूर्याचं हे संक्रमण नकारात्मक ठरणार आहे. सूर्य हा अग्निमय ग्रह असल्याने अशा स्थितीत धनु राशीत सूर्याच्या संक्रमणामुळे या लोकांना त्यांच्या जोडीदारासोबतच्या नात्यात अनेक वादांना तोंड द्यावं लागणार आहे. तुमचा अभिमान देखील या काळात वाढणार आहे. ज्यामुळे तुमच्या नातेसंबंधात तणाव निर्माण होणार आहे. जोडीदारासोबत वाद टाळा नाहीतर अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. वैवाहिक जीवनात चढ-उतारांना सामोरे जावं लागणार आहे. व्यवसायातही मोठं नुकसान होण्याची भीती आहे. 


कर्क रास (Cancer Zodiac)   


 


सूर्याचं संक्रमण या राशीच्या लोकांच्या अडचणींचा ठरणार आहे. या राशीच्या लोकांच्या खर्चात दुप्पट वाढणार आहे. या राशीचे लोक पैशाच्या वाढत्या खर्चामुळे मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असणार आहेत. या काळात तुमची किंवा तुमच्या आईची तब्येत बिघण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना हॉस्पिटलच्या पायऱ्या चढावा लागणार आहे. औषधांवरही तुमचा मोठा खर्च होणार आहे. वाहन अतिशय काळजीपूर्वक चालवा अन्यथा महागात पडेल. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)