जन्माष्टमीला `या` वस्तू घरात आणा; सुख-समृद्धी नांदेल तुमच्या घरात!
जन्माष्टमीच्या दिवशी बालगोळाला आवडणाऱ्या काही गोष्टी खरेदी केल्यास घरातील सुख-समृद्धी नांदेल.
Janmashtami 2022 : भाद्रपद महिना सुरु झाला की सणांची रेलचेल सुरु होते. लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारा आणि लोकप्रियक सण म्हणजे जन्माष्टमी. हिंदू धर्मात बाळकृष्णाचा जन्म उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्याची परंपरा आहे. घरोघरी रात्री 12 वाजता बालगोपाळचा जन्मदिवस साजरा करण्यात येतो. त्यादिवशी श्रीकृष्णाला आवडणाऱ्या गोष्टी घरात केल्या जातात. महिला जन्माष्टमीला उपवास करतात. यंदा जन्माष्टमी (Janmashtami 2022) गुरुवारी 18 तारखेला आहे. तर 19 तारखेला महाराष्ट्रात दहीहंडी साजरा करण्यात येणार आहे.
जन्माष्टमीच्या दिवशी बालगोळाला आवडणाऱ्या काही गोष्टी खरेदी केल्यास घरातील सुख-समृद्धी नांदेल.अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत. या जन्माष्टमीला तुम्ही या गोष्टी खरेदी करा. (trending news janmashtami buy these items on krishna janmashtami bring happiness and prosperity to your home in marathi)
'या' वस्तू घेणे शुभ मानलं जातं
बासरी - लडूगोपालला बासरीची खूप आवडते. आपण कायम बासरी वाजणारा श्रीकृष्णाची मुर्ती पाहिली आहे. जन्माष्टमीच्या दिवशी लाकडी किंवा चांदीची बासरी खरेदी करा. असं म्हटलं जातं की, घरात बासरी असल्याने कोणत्याही समस्या येत नाही आणि घराची आर्थिक स्थिती मजबूत राहते.
मोरपंख - श्रीकृष्णाला आवडत्या वस्तूंमध्ये सगळ्यात जास्त आवडणारी दुसरं वस्तू आहे मोरपंख. श्रीकृष्णाच्या मुकुटात मोराची पिसे ठेवली जातात. ज्योतिष शास्त्रानुसार जन्माष्टमीच्या दिवशी मोरपंख घेतल्यास ग्रहांचे दोष दूर होतात.
लोणी- नटख नंदला श्रीकृष्णाची सगळ्यात आवडची वस्तू म्हणजे लोणी (माखण). त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला लोणीचं नैवेद्य अपर्ण केला जातो.
वैजयंती माला- ही श्रीकृष्णाला खूप प्रिय असते. म्हणून जन्माष्टमीच्या दिवशी वैजयंती हार विकत घेतला जातो. त्यामुळे घरामध्ये मंगलमय वातावरण राहतं असं ज्योतिष शास्त्रात सांगण्यात आलं आहे.
गाय-वासराची मूर्ती- घरामध्ये गाय-वासराची मूर्ती ठेवणं शुभ असतं असं ज्योतिष शास्त्रात सांगितलं आहे. त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी गाय-वासराची मूर्ती विकत घेतली जाते. ही मूर्ती घरात ईशान्य दिशेला ठेवल्यास श्रीकृष्णाची कृपा तुमच्यावर राहते. यामुळे तुमचं नशीब वाढतं आणि मुलं सुखी राहतात.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)