रक्षाबंधन अगदी काही दिवसांवर आलाय सगळ्या बहिणींनी भावाकडून काय काय हवाय त्याची लिस्टसुद्धा एव्हाना तयार केली असेल,रक्षाबंधन एक पवित्र सोहळा म्हणून ओळखला जाणारा सण आहे. भावा-बहिणीच्या नात्याचा अनोखा असा हा सोहळा  प्रत्येक भाव बहिणीच्या अत्यंत जलाचा आणि जिव्हाळ्याचा असतो. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीला हवी ती भेटवस्तू देतो . खरतर बहिणीला हवं ते देण्याची ही  प्रथा खूप पारंपारिक आहे रक्षाबंध का साजरा केला जातो यामागे एक पौराणिक कथा आहे चला तर मग जाणून घेऊया 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


धार्मिक कथांनुसार, जेव्हा राजा बळीने अश्वमेध यज्ञ केला तेव्हा भगवान विष्णूंनी  वामन अवतार घेतला आणि राजा बळीला तीन पाऊल मावतील इतकी  जमीन दान करण्यास सांगितले. राजाने तीन पाऊल जमीन देण्यास हो म्हटले होते. राजाने हो म्हणताच भगवान विष्णूंनी आकार वाढवला आणि संपूर्ण पृथ्वी तीन पाउलांमध्ये व्याप्त केली आणि राजा बळीला पाताळात राहण्यासाठी पाठवले. तेव्हा राजा बळीने भगवान विष्णूकडे वरदान मागितले की,''जेव्हा मी जिथे पाहीन तिथे मला फक्त तूच दिसला पाहिजेस प्रत्येक क्षणी मी  जेव्हाही उठेन मला आदी तुझं दर्शन घडायला हवे''.देवाने राजा बळीची इच्छा पूर्ण केली आणि त्याला वरदान दिले आणि त्याच्यासोबत पाताळात राहायला गेला  


भगवान विष्णू राजासोबत राहत असल्यामुळे देवी लक्ष्मी चिंतित झाली आणि त्यांनी सर्व प्रकार नारदजींना सांगितला.
तेव्हा नारदजींनी माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना परत आणण्याचा मार्ग सांगितला. नारदजींनी माता लक्ष्मीला सांगितले की तू राजा बळीला आपला भाऊ बनव आणि भगवान विष्णूला त्याच्याकडून मागून घे .


नारदजींचे म्हणणे ऐकून माता लक्ष्मी वेषांतर करून  बळी राजाकडे गेली आणि त्यांच्या जवळ जाताच रडू लागली. राजा बळीने माता लक्ष्मीला रडण्याचे कारण विचारले तेव्हा माता लक्ष्मीने सांगितले की, तिला भाऊ नाहीये म्हणूनच ती रडत आहे. राजाने म्हणणे ऐकले आणि सांगितले की ''आजपासून मी तुझा भाऊ आहे''. त्यानंतर माता लक्ष्मीने राजा बळीला राखी बांधली आणि भेटस्वरूपात  भगवान विष्णूची मागणी केली.राजा बळी यासाठी नकार देऊच शकत न्हवता आणि तेव्हापासून भाव-बहिणीचा हा पवित्र सण साजरा केला जातो, असे मानले जाते.