Trigrahi Yog In Mithun: ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी  राक्षसांचा स्वामी शुक्र ग्रहाने 12 जून रोजी मिथुन राशीत प्रवेश केला आहे. यानंतर, 14 जून रोजी बुध स्वतःच्या राशीत मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. तर 15 जून रोजी ग्रहांचा राजा सूर्याने देखील या राशीत प्रवेश केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा परिस्थितीत ज्योतिष्य शास्त्राप्रमाणे, 15 जून रोजी मिथुन राशीमध्ये शुक्र, बुध आणि सूर्य यांचा संयोग झाला आहे. यामुळे काही राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनात शुभ परिणाम मिळू शकणार आहे. तर काही राशीच्या लोकांना सावध राहण्याची गरज आहे. कालपुरुष कुंडलीनुसार, मिथुन हा संवादाचं प्रतीक मानलं जातं. अशा स्थितीत या राशीमध्ये हे तीन ग्रह एकत्र आले तर काही वेगळे गुण दिसू शकतात. जाणून घेऊया मिथुन राशीतील शुक्र, बुध आणि सूर्य यांच्या संयोगाने तयार झालेल्या त्रिग्रही योगामुळे कोणत्या राशींना त्रास होण्याची शक्यता आहे.


कर्क रास (Karka Zodiac)


या राशीमध्ये बाराव्या घरात तिन्ही ग्रहांचा संयोग होणार आहे. अशा परिस्थितीत, या राशीच्या लोकांसाठी ते अनुकूल सिद्ध होणार नाही. काही कामात विलंब होऊ शकतो. जीवनात अनेक समस्या उद्भवू शकतात. यासोबतच आर्थिक परिस्थितीवरही विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत कर्ज घेण्याची गरज भासू शकते. निरुपयोगी गोष्टींमध्ये पडणे टाळा. या काळात तुमचं नुकसान करू शकतं. काही कारणांमुळे समाजातही आदराचा अभाव दिसून येतो. थोडी काळजी घेण्याची गरज आहे. 


धनु रास (Dhanu Zodiac)


या राशींमध्ये सूर्य, बुध आणि शुक्र यांचा संयोग सातव्या भावात असणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांसाठी हे मिश्रण संमिश्र असणार आहे. त्रिग्रही योग या राशीच्या लोकांना अपार यश मिळवून देऊ शकतो. भागीदारीत केलेल्या व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात. नात्यांबाबत थोडे सावध राहा, कारण काही कारणाने तुमच्या नात्यात खळबळ येऊ शकते. कुटुंबामध्ये काही समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचसोबत तुम्ही आजारी पडू शकता.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )