Trikona Rajyoga: ज्योतिषशास्त्रात, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर दुसर्‍या राशीत प्रवेश करतो. ज्यावेळी ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला गोचर, मार्गी आणि वक्री असं म्हटलं जातं. ग्रहांची वक्री स्थिती उलट गतीशी संबंधित असते, तर थेट गतीला ग्रहाची मार्गी गती म्हणतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, 2023 मध्ये 30 वर्षानंतर शनिदेव त्यांच्या मूळ त्रिकोण राशीत कुंभ राशीमध्ये उपस्थित आहेत. शनिदेव कुंभ राशीमध्ये वक्री अवस्थेत फिरत आहेत. शनीच्या या स्थितीमुळे त्रिकोण राजयोग तयार झाला आहे. अशा स्थितीत 3 राशीच्या लोकांना 2025 पर्यंत या त्रिकोण राजयोगाचा लाभ मिळणार आहे. जाणून घेऊया या राजयोगाचा कोणत्या राशींच्या व्यक्तींना चांगला आणि सकारात्मक परिणाम मिळणार आहे.


सिंह रास


शनीच्या वक्री चालीमुळे तयार झालेला त्रिकोण राजयोग सिंह राशीच्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. या राजयोगाच्या प्रभावामुळे 3 नोव्हेंबरपर्यंत व्यवसायातून मोठा आर्थिक लाभ होणार आहे. या राजयोगाच्या शुभ प्रभावामुळे नोकरीत असलेल्यांना प्रमोशन मिळू शकते. तुम्हाला मोठ्या प्रकरणात विजय मिळू शकतो. अचानक धनलाभाचे योग येतील. या काळात वैवाहिक जीवन खूप आनंदी असणार आहे. या काळात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. 


तूळ रास


शनीचा त्रिकोण राजयोग 2025 पर्यंत तूळ राशीच्या लोकांना लाभ मिळणार आहे. या काळात कौटुंबिक जीवन आनंदी राहणार आहे. या काळात व्यवसायात आर्थिक लाभाच्या अनेक संधी मिळतील. तुम्हाला नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. व्यवसायात चांगले यश मिळेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत. या राजयोगाच्या प्रभावामुळे जमीन-मालमत्तेच्या कामात प्रचंड फायदा होण्याची शक्यता आहे.


धनु रास


शनिदेवाच्या वक्री चालीमुळे तयार झालेला त्रिकोण राजयोग धनु राशीच्या लोकांसाठी चांगला वरदान ठरणार आहे. या काळात नोकरी-व्यवसायात मोठी प्रगती होईल. नोकरीत बढतीसोबतच पगारातही वाढ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात आनंद मिळणार आहे. परदेशातून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात लाभाच्या भरपूर संधी मिळतील. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )