नवी दिल्ली : धनत्रयोदशीला कुबेराची तर दिवाळीला लक्ष्मीची पूजा केली जाते. असे मानले जाते की, लक्ष्मी आणि कुबेराला प्रसन्न केल्यास कधीही धनाची कमतरता भासत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्या व्यक्तीला लाभच लाभ होतो. तसेच धनलाभ किंवा मालामाल व्हायचं असेल तर आणखी काही उपाय दिवाळीत केले जातात. महत्वाची गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला जास्त मेहनत घेण्याचीही आवश्यकता नाही. लक्ष्मीचा आशिर्वाद मिळवण्यासाठी दिवाळीच्या दिवशी मूर्ती किंवा फोटोजवळ लक्ष्मीच्या चरणाशी कवड्या ठेवा. ज्योतिषांचं म्हणनं आहे की, असे केल्यास धनलाभ होतो. 


पुढीचा उपाय त्यांच्यासाठी जे आपल्या घरात तिजोरी ठेवतात. तिजोरीच्या दरवाज्यावर असा फोटो लावा ज्यात लक्ष्मी बसलेली असेल. हे चित्र पारंपारिक असायला हवं. असा फोटो तिजोरीवर लावल्याने त्या घरात आणि तिजोरीत नेहमीच लक्ष्मीची कृपा दृष्टी असते. अशा लोकांना कधीही धनाची कमी होत नाही, असे मानले जाते.  


कुबेराला धनाचा देवता मानलं जातं. अशी मान्यता आहे की, देवता कुबेरचं स्थान उत्तर दिशेला असतं. त्यामुळे रक्कम जिथेही ठेवली असेल ती उत्तर दिशेला ठेवावी. याने लाभ होईल. रत्न आणि दागिण्यांसाठीही दिशा असते. ते तुम्ही दक्षिण दिशेला ठेवावेत. 


धनत्रयोदशी आणि दीपावलीला महालक्ष्मी यंत्राची पूजा करून याची स्थापना करणे फायद्याचे असते. हे यंत्र धन वॄद्धीसाठी फायद्याचं ठरतं.