Anant Chaturdashi 2022: भाद्रपद महिन्यातील अंनत चतुर्दशीला लाडक्या बाप्पाचं विसर्जन केलं जातं. या वर्षी अनंत चतुर्दशी 9 सप्टेंबर 2022 रोजी येत आहे. अनंत चतुर्दशी भगवान विष्णूंना समर्पित आहे. या दिवसांचं औचित्य साधत अनेक भाविक व्रत करतात. त्याचबरोबर हातात अनंत बांधतात. पुरुष डाव्या, तर स्त्रिया आपल्या उजव्या हातात अनंत बांधतात. अनंत सूत्रात 14 गाठी बांधलेल्या असतात. या 14 गाठी भूर्लोक, भुवर्लोक, स्वर्लोक, महर्लोक, जनलोक, तपोलोक, ब्रह्मलोक, अतल, वितल, सतल, रसातल, तलातल, महातल आणि पाताल लोक यांच्याशी संबंधित आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनंत चतुर्दशीला रवि योग आणि सुकर्म योग तयार होत आहेत. ज्योतिषशास्त्रात या योगांना विशेष महत्त्व दिले गेले आहे. या योगांमध्ये गणेश आणि भगवान विष्णूची पूजा केल्यास दुहेरी फळ मिळते. या दिवशी सकाळी 06 वाजून 02 मिनिटांनी ते 11 वाजून 34 मिनिटापर्यंत रवि योग सुरू होतो. त्याच वेळी, सुकर्म योग सकाळपासून सुरू होऊन संध्याकाळी 06 वाजून 11 मिनिटापर्यंत असतो. 


अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. तसेच पूजेच्या ठिकाणी स्वच्छ वस्त्र परिधान करून पिवळे वस्त्र टाकून भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावे. यानंतर विष्णूला चंदन अर्पण करावे. त्यानंतर धागा घेऊन हळदीने रंगवा आणि त्यात 14 गाठी बांधा. हे सूत्र भगवान विष्णूच्या फोटोसमोर ठेवा. आता भगवान विष्णू आणि अनंत सूत्राची पूजा करा आणि त्यानंतर अनंत सूत्र आपल्या हातात बांधा.


दुसरीकडे, या दिवशी लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातो. त्यामुळे या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे. अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन शुभ मानले जाते. या दिवशी गणपतीचे विसर्जन केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते. चला तर मग जाणून घेऊयात विसर्जनासाठीचा शुभ मुहूर्त..


  • सकाळी 6 वाजून 2 मिनिटांनी ते सकाळी 10 वाजून 45 मिनिटांपर्यंत

  • दुपारी 12 वाजून 19 मिनिटांनी ते दुपारी 1 वाजून 53 मिनिटांपर्यंत

  • संध्याकाळी 5 ते संध्याकाळी 6 वाजून 32 मिनिटांपर्यंत


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)